Breaking
ई-पेपरकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषीवार्ताकेळी उत्पादक संघटनानेवासा तालुकाब्रेकिंगशिबिरशेतकरी मेळावा

उसाचे उत्पादन व रिकव्हरी वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे : कृषी शास्त्रज्ञ हापसे

खूपटी येथे भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न; शेतीतील प्रयोग, तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व जिवाणू खतांवर सखोल चर्चा

0 7 0 7 2 1

उसाचे उत्पादन व रिकव्हरी वाढविण्यासाठी जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे : कृषी शास्त्रज्ञ हापसे

 

खूपटी येथे भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न; शेतीतील प्रयोग, तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व जिवाणू खतांवर सखोल चर्चा

नेवासा : तालुक्यातील खूपटी येथे भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानावर तसेच उत्पादनवाढीच्या उपाययोजनांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश काका कारले होते. सरपंच गोरक्षनाथ तनपुरे यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांचे स्वागत केले.

 

माजी कुलगुरू डॉ. अशोकराव ढगे यांनी शेतकरी आत्महत्यांबद्दल दुःख व्यक्त करताना शेतमालाला हमीभावाचे कायदेशीर संरक्षण मिळणे ही काळाची गरज असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळाल्याशिवाय शेती अर्थव्यवस्था सक्षम होणार नाही, असे प्रतिपादन केले.

 

ऊस उत्पादन वाढीसाठी बेणे, पाणी व खत व्यवस्थापन महत्त्वाचे

डॉ. रमेश हापसे यांनी ऊस उत्पादन वाढीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. दर्जेदार बेण्याची निवड, योग्य पाणी व्यवस्थापन तसेच खतांचा संतुलित वापर याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.

╔══════════════════════════════════════════════════╗ ║ 🌾 कृषी शास्त्रज्ञडॉक्टर रमेश हापसे  साहेबांचे मार्गदर्शन 🌾 ║ ╠══════════════════════════════════════════════════╣ ║ ║ ║ उसाचे चांगले उत्पादन आणि रिकव्हरी मिळविण्यासाठी चांगल्या ║ ║ जातींची निवड करून लागवड करणे आवश्यक आहे. जमिनीमध्ये ║ ║ सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असल्यास पिकाला जमिनीतून ║ ║ आवश्यक अन्नद्रव्ये चांगल्या पद्धतीने मिळण्यास मदत होते. ║ ║ मायकोरायझासारख्या उपयुक्त जैविक घटकांमुळे उसाच्या ║ ║ मुळांची वाढ आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. ║ ║ ║ ║ उसाचे मूळ आणि पाने ही अन्नद्रव्ये घेण्याची महत्त्वाची ║ ║ माध्यमे आहेत. उसाचे वय वाढल्यानंतर मुळांद्वारे अन्नद्रव्ये ║ ║ घेण्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. अशावेळी पिकाची ║ ║ गरज लक्षात घेऊन पानांवर योग्य अन्नद्रव्यांची फवारणी ║ ║ केल्यास उसाच्या वजनात वाढ होण्यास मदत होऊ शकते. ║ ║ ║ ║ उसाच्या पानांची रुंदी किमान चार बोटांपर्यंत असणे चांगल्या ║ ║ वाढीचे लक्षण मानले जाते. तसेच उसाच्या लागवडीमध्ये सरीचे ║ ║ अंतर योग्य असल्यास पिकाला हवा आणि सूर्यप्रकाश चांगला ║ ║ मिळतो. त्यामुळे उसाच्या तनेजच्या वाढीसह रिकव्हरीमध्येही ║ ║ वाढ होण्यास मदत होऊ शकते. ║ ║ ║ ║ जमीन योग्य वाफसा स्थितीत ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ║ ║ पाणी जास्त झाल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये पाण्याबरोबर खाली ║ ║ वाहून जाण्याची म्हणजेच लिचिंग होण्याची शक्यता असते. ║ ║ त्यामुळे पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात मिळत ║ ║ नाहीत. पाण्याचे योग्य नियोजन करून जमीन वाफसा स्थितीत ║ ║ ठेवणे आवश्यक आहे. ║ ║ ║ ║ योग्य वाण, सेंद्रिय कर्ब, मुळांची चांगली वाढ, योग्य ║ ║ सरी अंतर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाण्याचे ║ ║ नियोजन या सर्व बाबींचा एकत्रित विचार केल्यास उसाचे ║ ║ उत्पादन व रिकव्हरी वाढविण्यास मदत होऊ शकते. ║ ╚══════════════════════════════════════════════════╝

जिवाणू खतांचा वापर जमिनीच्या आरोग्यासाठी आवश्यक

डॉ. डी. बी. ताकटे यांनी जिवाणू खतांचे महत्त्व आणि विविध पिकांसाठी त्यांची उपयुक्तता स्पष्ट केली. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या कमी होत असल्याने पिकांच्या गरजेनुसार जिवाणू खतांचा वापर करणे आवश्यक आहे. जिवाणू खते हाताळण्यास सोपी, तुलनेने स्वस्त असून जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी त्यांचा योग्य वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

शेती ही प्रयोगशील आहे’; पुरुषोत्तम सर्जे यांचे अनुभवाधारित मार्गदर्शन

मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रगतशील शेतकरी आणि महाराष्ट्र राज्य केळी बागायतदार संघाचे मार्गदर्शक श्री. पुरुषोत्तम सर्जे यांनी स्वतःच्या शेतीतील अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडले.

शेती करताना नवनवीन प्रयोग करण्यासाठी डॉ. ताकटे यांचे मार्गदर्शन घेत असल्याचे सांगत सर्जे यांनी, प्रयोग करताना अनेकदा नुकसानही झाले आणि काही प्रयोगांमधून उत्पन्नात लक्षणीय वाढही झाली, असे अनुभव सांगितले. त्यामुळे ‘शेती ही प्रयोगशील आहे’, हा दृष्टिकोन शेतकऱ्यांनी स्वीकारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

शेतीमध्ये प्रत्यक्ष उतरून जमिनीची मशागत, खतांचा योग्य वापर, पिकांचे संगोपन, पाणी व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञान यांचा प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यास केला पाहिजे, असे सर्जे यांनी सांगितले. तसेच मेळाव्यातील व्याख्यात्यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारून त्यातून उपस्थित शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती मिळावी, यासाठी त्यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.

त्यांनी स्वतःच्या शेतीतील प्रयोग आणि त्यातून आलेले यश-अपयश स्पष्टपणे मांडल्याने शेतकऱ्यांसाठी अनुभवाधारित मार्गदर्शनाचा महत्त्वपूर्ण पैलू या मेळाव्यात समोर आला.

शेतकऱ्यांचा प्रश्नोत्तरातून सक्रिय सहभाग

उपसरपंच किशोर कुऱ्हे, सोसायटीचे चेअरमन प्रकाश कारले, व्हाईस चेअरमन सुनील गव्हाणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोवर्धन गव्हाणे, सोमनाथ काळे, कृषी अधिकारी शेळके पाटील, गोणेगावचे माजी सरपंच प्रकाश रोडे, सोपानराव शिंदे, भाऊसाहेब चौधरी आणि जगदीश चौधरी यांनी शेतीशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.यावेळी खबरनामा न्यूज चे संपादक हे उपस्थित होते 

 

यावेळी शेतमालाचे अर्थशास्त्र, ऊस उत्पादन वाढीचे तंत्र-मंत्र, जिवाणू खतांचा प्रभावी वापर, जमिनीचे आरोग्य, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक शेतीतील प्रयोग या विषयांवर वैचारिक व सखोल चर्चा झाली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवीण कुऱ्हे यांनी केले. उपस्थित शेतकऱ्यांनी मेळाव्यातील मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

2/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 0 7 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे