श्री क्षेत्र गोगलगाव मध्ये ओसंडला आनंदाचा सागर ….!!
नेवासा येथील "वचनपूर्ती आणि लोकार्पण सोहळ्या" निमित्त आज नवरात्र उत्सवामध्ये 51 निराधार,अपंग दिन-दलीत, गोर गरीब या महिलांना आज श्री क्षेत्र गोगलगाव मधील शेतकरी संघटनेने न्याय मिळवून दिला
माननीय अजित काळे साहेब यांनी संजय गांधी निराधार डोल मिळवन दिल्याबद्दल परमपूज्य स्वामी गुरुवर्य संत महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
श्री क्षेत्र गोगलगाव मध्ये ओसंडला आनंदाचा सागर ….!!
नेवासा (प्रतिनिधी) प्रतिनिधीमौजे .गोगलगाव ता. नेवासा येथील “वचनपूर्ती आणि लोकार्पण सोहळ्या” निमित्त आज नवरात्र उत्सवामध्ये 51 निराधार,अपंग दिन-दलीत, गोर गरीब या महिलांना आज श्री क्षेत्र गोगलगाव मधील शेतकरी संघटनेने न्याय मिळवून दिला .आज ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला अशा सर्वांना आनंद काय असतो याची अनुभूती आज आली. प्रत्येक निराधार दिन दलित महिलांच्या डोळ्या मध्ये आनंदाश्रू ओसंडत होते. ज्या महिलांना ज्याला भारतीय अपंग निराधार विधवा महिलांना लाभ मिळाल्या अशा सर्व महिलांनी शेतकरीच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ओवाळले आणि भावाने ताटामध्ये “आयुष्यभरा शिदोरीची ओवाळणी म्हणून त्यांना प्रमाणपत्र ओवाळणी भेट दिली.
ओवाळणी कशी असावी याचा एक उत्तम आणि एक आदर्श उदाहरण श्री क्षेत्र गोगलगाव मध्ये बघायला मिळाले .प्रमाणपत्र हि अनोखी ओवाळणी भेट हिआयुष्यात प्रथमच बघावयास मिळाली. हेसत्कर्म करण्याचं भाग्य मलाहि मिळाले असे उद्गार मां.तहसीलदार (संजय गांधी विभाग) यांनी काढले. एकाहि रुपयास हात न लावता त्यांनी प्रकरणे मंजूर करून दिली. त्याबद्दल महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ह्या हा नयन रम्य सोहळ्यास गावातील सर्व भाविक उपस्थित होते.कार्यक्रमानंतर सर्व त्या गोरगरीब महिलांनी स्वतः वर्गणी करून पुरणपोळ्याचा ब उपवास फराळ शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व गावातील नागरीकांना आपल्या हाताने जेऊ घातलं आणि अतिशय आनंदाने निरोप दिला. निरोप देताना प्रत्येक महिलेच्या डोळ्यांमध्ये अश्रू समजून वाहत होते.आपल्याला शेतकरी संघटनेने लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. खूप खडतर परिश्रमातून मिळालेलाहा आनंद त्यांना मिळत होता आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओसंडून वाहत होते. देदीप्यमान असा हा “वचनपूर्ती लोकार्पण सोहळा” आज पार पडला
त्यानिमित्त शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष Adv.अजित दादा काळे साहेब , उप जिल्हाध्यक्ष श्री .हरि आप्पा पवार, श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष प्रभाकर कांबळे नेवासा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष अशोकराव काळे, युवा आघाडीचे डॉक्टर रोहित कुलकर्णी ,उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे , कायदेशीर सल्लागार श्री कावळे भाऊसाहेब सभा स्थानी ह भ प.दिनकर महाराज मते, गोगल गावात मधील नेते अनिलराव मते , कल्याणराव मते, भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे, किरण लंघे , दादा नाबदे, बापू देशमुख, सोमनाथ औटी, दत्तू पाटील निकम, कैलास पाटील पवार, अजय तुवर,करून सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.