शेतशिवपानंद रस्त्यांना ऐतिहासिक चालना : आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विशेष लक्षवेधीमुळे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतशिवपानंद रस्ता योजना’ जाहीर
नेवासा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतशिवपानंद व शेतरस्त्यांच्या प्रश्नाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. हिवाळी अधिवेशन, नागपूर येथे मा.आमदार श्री विठ्ठलराव लंघेसाहेब यांनी ‘विशेष लक्षवेधी’ सूचनेद्वारे नेवासा तालुक्यातील शेतशिवपानंद रस्त्यांचा तसेच राज्यातील इतर भागांतील शेतीशिवार रस्त्यांचा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केला.

📰 खबरनामा न्यूज | नेवासा
शेतशिवपानंद रस्त्यांना ऐतिहासिक चालना : आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या विशेष लक्षवेधीमुळे ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतशिवपानंद रस्ता योजना’ जाहीर
नेवासा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतशिवपानंद व शेतरस्त्यांच्या प्रश्नाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. हिवाळी अधिवेशन, नागपूर येथे मा.आमदार श्री विठ्ठलराव लंघेसाहेब यांनी ‘विशेष लक्षवेधी’ सूचनेद्वारे नेवासा तालुक्यातील शेतशिवपानंद रस्त्यांचा तसेच राज्यातील इतर भागांतील शेतीशिवार रस्त्यांचा प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केला.
या ठोस भूमिकेमुळे मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व मा.महसुलमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेऊन “मुख्यमंत्री बळीराजा शेतशिवपानंद रस्ता योजना” जाहीर केली. ही योजना शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर ऐतिहासिक दिलासा देणारी ठरली आहे.
🔹 त्रिस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा
या योजनेअंतर्गत
राज्यस्तरावर : मा.महसुलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती,
जिल्हास्तरावर : मा.पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती,
तालुकास्तरावर : संबंधित तालुक्याचे मा.आमदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती
अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांनी एकमुखी निर्णय घेत शेतकरी हितासाठी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
👇👇येथे संपूर्ण कार्यक्रमाची बातमी पहा
🔹 आमदार लंघे साहेबांचा सत्कार
या महत्त्वपूर्ण कार्याचे श्रेय आमदार विठ्ठलराव लंघेसाहेब यांच्या विशेष लक्षवेधी सूचनेला देत, महाराष्ट्र राज्य ‘शेतशिवपानंद रस्ता चळवळीचे’ प्रणेते मा.शरद पवळेसाहेब व राज्य उपाध्यक्ष मा.नाथाभाऊ शिंदे सर यांच्या पुढाकाराने आज दि. १८/०१/२०२६ रोजी आमदार साहेबांचा छोटेखानी पण अर्थपूर्ण सत्कार सोहळा पार पडला.
प्रथमतः मा.शरद पवळेसाहेब यांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन आमदार साहेबांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी शेतरस्ता चळवळीचा उगम, संघर्ष आणि “शेवटच्या शेतकऱ्याला शेतशिवपानंद रस्ता मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही” हा निर्धार उपस्थितांसमोर मांडला.
त्यानंतर मा.नाथाभाऊ शिंदे सर यांनीही आमदार साहेबांचा सत्कार करून शेतरस्ते मामलेदार कोर्ट अॅक्ट ५(२) व १९६६ अंतर्गत १४३ रस्त्यांसाठी नि:शुल्क पोलिस बंदोबस्त व नि:शुल्क भूमी अभिलेख मोजणी व्हावी, अशी आग्रहाची मागणी केली.
🔹 शेतकऱ्यांसाठी सदैव उपलब्ध
सत्कारास उत्तर देताना आमदार विठ्ठलराव लंघेसाहेब यांनी शेतकरी हितासाठी चोवीस तास उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. नेवासा परिसरापुरते मर्यादित न राहता राज्यस्तरीय शेतकरी परिसंवाद लवकरच आयोजित करण्याची घोषणा करत त्यांनी मा.शरद पवळेसाहेबांना यावेळी औपचारिक निमंत्रण दिले.
याचप्रसंगी मा.नाथाभाऊ शिंदे सर यांची तालुकास्तरीय समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली. तसेच सौ.ज्योतीताई पवळे मॅडम व सौ.भळगटताई यांचाही सत्कार करण्यात आला.
🔹 दर्शन व समारोप
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व सदस्यांसह ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील “पैस” खांबाचे दर्शन, माहिनीराज मंदिर, “भुलोकीचा स्वर्ग” म्हणून प्रसिद्ध देवगड येथे भेट, दत्तात्रय महाराजांचे दर्शन व प्रसाद ग्रहण करण्यात आला. अखेरीस मा.नाथाभाऊ शिंदे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
🔹 उपस्थित मान्यवर
या प्रसंगी रस्ता चळवळीचे सदस्य सर्वश्री बाळासाहेब थोरात, कानिफनाथ कदम, मनोहर मतकर, मुरलीधर जरे, रमेश भक्त, प्रशांत चौधरी, बापुराव काळे, अंकुश काळे, संजय काळे, रामभाऊ पवार, सोमा माकोणे, आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक विजय पवार, माजी सैनिक श्री एकनाथ गटकळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
📌 शेतकरी जीवनमरणाच्या प्रश्नाला वाचा फोडणारी ही योजना म्हणजे शेतरस्ता चळवळीचा निर्णायक विजय ठरत आहे.




