प्रहार जनशक्ती पक्षाची ‘हुंकार सभा’ गुरुवारी नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे — बच्चुभाऊ कडूंच्या नेतृत्वात शेतकरी व दिव्यांगांसाठी निर्धार
शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या न्यायहक्कासाठी महाराष्ट्रभर आंदोलनाचे रणशिंग फुंकलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे भव्य ‘हुंकार सभा’ घेणार आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाची ‘हुंकार सभा’ गुरुवारी नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे — बच्चुभाऊ कडूंच्या नेतृत्वात शेतकरी व दिव्यांगांसाठी निर्धार
नेवासा, जि. अहमदनगर – शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या न्यायहक्कासाठी महाराष्ट्रभर आंदोलनाचे रणशिंग फुंकलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू हे गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजता नेवासा तालुक्यातील गळनिंब येथे भव्य ‘हुंकार सभा’ घेणार आहेत.
शेतकऱ्यांना सातबारा कोरा, कर्जमाफी, पीकविमा, विजबिल माफी यांसारख्या प्रश्नांनी ग्रासले असताना सरकारच्या उदासीन धोरणांमुळे त्यांचे प्रश्न अधिक तीव्र झाले आहेत. दिव्यांग बांधवांना देखील न्याय मिळत नसल्याने बच्चुभाऊ कडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड गडावरून या संघर्षाची सुरुवात करून राज्यव्यापी लढा उभारला आहे.
या सभेच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शासनाला झोपेतून जागं करण्यासाठी निर्धाराने पुढे येत आहे.
बच्चुभाऊ कडू म्हणतात, “राजकारणात पराभव ठरलेला असतो, पण लढण्याची धमक ठेवावी लागते!” या निर्धारातून महाराष्ट्रभर दौरे घेत शेतकऱ्यांची ताकद पुन्हा एकवटली जात आहे.
📍 सभेचे ठिकाण: गळनिंब, ता. नेवासा, जि. अहमदनगर
🗓️ दिनांक: गुरुवार, २४ जुलै २०२५
🕢 वेळ: सायंकाळी ७:३० वा.
✨ सभेचे आयोजक व निमंत्रक मंडळ:
ज्ञानेश्वर सांगळे – जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, अहमदनगर
अॅड. पांडुरंग औताडे – युवा जिल्हाध्यक्ष
बाळासाहेब खर्जुळे – संपर्कप्रमुख
जालिंदर आरगडे – संघटक
रघुनाथ आरगडे – शेतकरी आर्मी प्रमुख
मधुकर शिंदे
अनिल विधाटे – तालुका प्रमुख
संदीप पाखरे – युवा जिल्हा उपाध्यक्ष
अरविंद आरगडे
पांडुरंग नवले
राजेंद्र कळस्कर
आदिनाथ कडू
दिलीपराव मते
गळनिंब ग्रामस्थ
🗣️ विशेष आवाहन:
या सभेला शेतकरी व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष व गळनिंब ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
✍️ प्रस्तुती:
खबरनामा न्यूज नेटवर्क
“शेतकऱ्याचा आवाज – लोकशक्तीसाठी पत्रकारिता”




