कृषीप्रधान भारत देशाचे वास्तव -!! भारत सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्य करुन आयात निर्यात धोरणांचा शस्त्रासारखा वापर करणे थांबवावे.शेतकरी जगवणे हे सरकारचे कर्तव्यच आहे…
अल्पभूधारक शेतकरी नांदेड जिल्ह्यातील घटना शेतकऱ्यांनी केली आत्महत्या... संपवली आपली जीवन यात्रा

नांदेड प्रतिनिधी:-नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी कुटुंबातील अल्पभूधरक शेतकऱ्याच्या मुलांनी प्रथम आत्महत्या केली. वडील शेतात गेल्याने असताना त्यांनी आपल्या मुलाचा आत्महत्या केलेल्या अवस्थेत पाहिली त्याचबरोबर त्यांनीही आपली स्वतःची जीवन यात्रा मुलावरून संपवली खूप मनाला दुःख देणारी घटना घडली आपल्या मुलाचा हट्ट पुरवता आला नाहीं आणि कुटुंबाच्या गरजा भागवता आली नाही म्हणून आत्महत्या करून आपल्या जीवनातील अपयश सहन न झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
!-कृषीप्रधान भारत देशाचे वास्तव -!! भारत सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्य करुन आयात निर्यात धोरणांचा शस्त्रासारखा वापर करणे थांबवावे.शेतकरी जगवणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. निसर्गाचा कोप तसेच सरकारचे शेती विरोधी धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतीपूरक व्यवसाय सुरु करणे संबधी सरकारने शेतकय्रांस प्रशिक्षण देऊन कर्ज पुरवठा करायला हवा.लुटीच्या धोरणाने शेतकऱ्यांना उत्पादनखर्च भरून निघेल एवढा भाव शेतपिकाला मिळू दिला जात नाही शेतीव्यवसाय प्रचंड आतबट्याचा झाल्या मुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱी पोटच्या पोराला शालेय शिक्षण साहित्य देवू शकला नाही म्हणून पोराने शेतात जाऊन आत्महत्या केली.पाठोपाठ बापाने पणं स्वतःला फासावर लटकवले.सरकारने शिवरायांचे शेतीविषयीचे धोरण राबवून शेतकरी आत्महत्या थांबवाव्यात . महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अजित काळेेेसाहेब यांच्यावतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की कृपया कुणी आत्महत्या करू नये. या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध आणि भावपूर्ण श्रद्धांजली शेतकरी कुटुंबाला.