निसर्ग प्रकोप
इंजी. अर्जुन तोरवणे. गावखेती संकल्पना शोध कर्ता

*निसर्ग प्रकोप*
विश्वातील समस्त जिव, जंतू, पशू, पक्षी, मानव यांना लागणारे अन्न नाशवंत आहे. ठराविक / विशिष्ट वेळेत सर्व प्रकारचे अन्न खराब होते व ठराविक / विशिष्ट वेळेत पुन्हा तयार होते. हि आहे निसर्ग चक्राची कमाल, परंतु मनुष्य आपल्या स्वार्थासाठी, निसर्गाला इजा पोहचवत आहे, निसर्ग चक्रात हस्तक्षेप करीत आहे. यात झाडांची तोड करणे, विषयुक्त शेती करणे, पशु-पक्षांची कत्तल करणे, हि मुख्य करणे आहेत. म्हणून निसर्ग प्रकोप सुरु झाला असून, यामुळे अवेळी पाऊस पडत आहे. अति वृष्टी, दुष्काळ, अति थंडी किंवा कडक उन्हाळा या सारखे बदल जाणवत आहेत. यालाच आपण हवामान बदल (climate change ) असे म्हणतो. जर मनुष्य वेळीच सावरला नाही तर निसर्ग प्रकोप मुळे होणारे परिणाम समस्त जीव सुष्टीला भविष्यात भोगावे लागतील हे मात्र निश्चितच आहे.
डॉ. इंजी. अर्जुन तोरवणे. गावखेती संकल्पना शोध कर्ता.