Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालघोंगडी बैठक आरक्षणनेवासा तालुकाब्रेकिंगमराठा आरक्षणशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

जरांगे पाटलाना पाठींबा देण्यासाठी नेवाशात उपोषण आंदोलन*

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे व सगे सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांनी आंतरवली सराटी या ठिकाणी पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनास राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे.

0 2 2 1 9 5

 

*जरांगे पाटलाना पाठींबा देण्यासाठी नेवाशात उपोषण आंदोलन*

नेवासा (प्रतिनिधी) :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे सूरू केलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज नेवाशात मराठा समजाकडून लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे व सगे सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांनी आंतरवली सराटी या ठिकाणी पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनास राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठींबा मिळत आहे. नेवासा तालुक्यातील मराठा बांधवा कडून देखील या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नेवासा शहरातील गणपती मंदीर चौकात लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात तालुका भरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने सामील झाले. महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेची प्रतिक उपाध्यक्ष अजित काळे साहेब पाठिंबा दिला.यावेळी संभाजी माळवदे यांनी आज मराठा समाजाची आर्थिक शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती घसरली असुन आरक्षणामुळे रोजगार, शिक्षणच्या संधी निर्माण होतील सामाजिक उन्नती होवून सर्वांगीण विकास होईल. त्यासाठी आरक्षणाचा लढा निकराने लढावा लागेल. संतोष काळे यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता लढा देणारे जरांगे पाटील यांच्या पाठीशी मराठा समाज हा भक्कमपणे उभा असुन आरक्षण न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेण्यात येईल.

अनिल ताके यांनी यापुढे आरक्षणासाठी लढा देणाऱ्याच्या पाठीशीच ठामपणे उभे राहणारअसे स्पष्ट केले.यावेळी शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे, नरेंद्र काळे, रासपाचे त्रिंबक भदगले, शशिकांत मतकर, रावसाहेब घुमरे, किशोर जोजार,नंदकुमार पाटील साहेब, सादीक शिलेदार,कल्याणराव पिसाळ,राष्ट्रवादीचे अब्दुल शेख, अभिजीत पोटे, गणेश झगरे, आण्णासाहेब पटारे, नीलिमा वाबळे, जयश्री शिंदे, राजेंद्र वाघमारे , संदिप अलवने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.या आंदोलनात सर्व पक्षातील मराठा बांधव सहभागी झाले तसेच मुस्लिम समाज व ईतर समाजाकडूनही या आंदोलनास पाठींबा देण्यात आला. यावेळी लक्ष्मणराव जगताप, गणपत मोरे,पी.आर. जाधव, प्रकाश निपंगे,ऍड.कारभारी वाखुरे, अंजुम पटेल, सोमनाथ गायकवाड, जयवंत मोटे, संदीप अलवणे, करण घुले, किशोर गारुळे, संभाजी पवार, केतन काळे, दिगंबर अवारे,सुनीलराव हापसे, गणेश चौगुले, अंबादास लष्करे, नीलम डौले, उषाताई मारकळी, लीलाबाई मारकळी, राम मगरे, उमेश ताकटे आदीसह नेवासा तालुक्यातील मराठा आंदोलक सहभागी झाले होती माननीय प्रदेश उपाध्यक्ष विधी तज्ञ अजित काळे  यांनी आज एक दिवसाच्या मराठा आरक्षण पाठिंबा दिला. यावेळी तालुका अध्यक्ष अशोक मेजर काळे व जिल्हा उपाध्यक्ष हरि आप्पा तूवर तसेच नरेंद्र काळे, दादासाहेब नाबदे, बापू देशमुख, गणेश चौगुले, भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे तसेच शेतकरी संघटनेचे कायदेशीर सल्लागार अडवोकेट कावळे भाऊसाहेब व संजय ठुबे, दत्तू पाटील निकम, धनंजय कंक,विश्वास मते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते उपोषण स्थळी. संभाजी माळवदे व संतोष काळे सर यांनी सर्वांचे आभार मानले आणि स्वागत केले.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे