
*शेती म्हणजे अन्नपूर्णा*
संपादकीय
#ज्यांच्या पूर्वजांनी पोटाला चिमटा घेऊन जमिनी राखल्या त्यांचीच लेकरं आज चारचौघात बसून जमीन विकून आलेल्या पैशाचे व्याज कीती येते आणि शेती कशी परवडत नाही हे शेतीतज्ञ किंवा अर्थतज्ञ असल्या सारखे लोकांना सांगत असतात…!!हि असल्या चर्चा ऐकूनच आमची पोरं शेती पासून दुरावली आणि भरकटलीही…!! मित्रांनो परवा परवा मुळशी पॅटर्न पाहिला… शेती विकायची नसती ओ.. राखायची असती..!! हा डायलॉग खूपच आवडला.. हा एक विचार आहे जो आपल्या लोकांनी कायम जपला..!! मुळात आपल्यापैकी प्रत्येकाला एक इतिहास आहे… स्वतःला पुस्तकाचे पहिले पान समजणाऱ्या प्रत्येकाला मला सांगायचं आहे… मित्रांनो आपल्या आधी अनेक पाने आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेली असतात आपल्या जगण्यातून..!! प्रत्येकाने ती वाचली पाहिजेत अभ्यासली पाहिजेत..!! मध्येच एक पान आपलं लागेल मग मात्र आपण काय करायला हवं आणि काय नाही ते आपोआपच लक्षात आल्याशिवाय रहात नाही…!! वयाच्या सत्तरीत विहीरी घोदून घेतल्या त्या जमिनी विकून खाण्यासाठी नव्हे… तर शेती कसताना तुमचे कष्ट कमी व्हावेत म्हणून…!!!! आणि आमची पोरं सांगणार शेती विकून परवडते म्हणून.. कुणाची शेती विकणार…?? ज्यांनी उभी हयात अडचणीत घालवली पण जमिनीला हात लावला नाही त्यांची..?? ज्यांनी दोन एकर घेतलेल्या जमिनीसाठी दुप्पट व्याज दिले त्यांची..?? एखाद्या झाडाला बुरशी लागावी किंवा एखाद्या मजबूत लोखंडाला गंज लागावा तशीच आमची अवस्था झाली आहे हे नक्की..!!! मला अनेक फोन आले लोकं सांगतात कधिच समजलं नाही ते आज कळतंय लिहीत रहा..!! पण मुळात आपण विसरलोच का..?? सानप म्हणून मराठवाड्यातील ग्रहस्थ..फोन आला.. सांगितले बापजादयांची तालेवार शेती.. त्या काळात फळबागा बहरलेल्या.. पंचक्रोशीतील लोक शेती पहायला येत.. वडलांच्या पाठीमागे शेती पडिक पडली आणि आम्ही नोकरी करत असल्याने या गोष्टी विसरून गेलो.. तुमच्या पोस्ट पाहून मात्र शेती परत एकदा फुलवण्याची जिद्द निर्माण झाली आहे…!! अनेकांना वाटत असेल मी हे का करतोय..!! मित्रांनो मी अल्प भु धारक शेतकरी आहे… पण माझ्या रक्तात शेती आहे..!! डीएनए ही अशी गोष्ट आहे ती आपल्या प्रत्येक पिढीत असते.. पण आपण फक्त माझा मुलगा माझ्या सारखा दिसतो, बोलतो, वागतो याचाच विचार करतो..!! पण शेती बद्दल जी ओढ आपल्या पाठिमागील पिढीला होती तीच ओढ, तेच प्रेम आपल्या रक्तात आजही आहे..!!! पण दुर्दैवाने ते आपण समजूनच घेत नाही आहोत..!! आपला हक्काचा असणारा हा समृद्ध ठेवा आपल्यालाच नाही समजला..!! ज्यांना समजला ते गाडी बंगले घेऊन स्वाभिमानाने जगतायत..!! जे भरकटले आहेत त्यांना समजावं.. आमच्या मित्रांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे म्हणून माझी शेती चांगल्या पद्धतीने करून हे सातत्याने मांडतोय…!! तेव्हा पहिलं ज्यांनी नकारात्मक बोलून आमची पोरं चुकीच्या मार्गाला लावली त्यांच्यापासून सावध रहायला हवं.. याच वयात संघर्षाची प्रचंड मानसिक तयारी करून मोठ्या उमेदीने शेतीत उतरायला हवं…!! बघता बघता एक दिवस तुमचे विश्व तुमच्या ताकदीच्या आणि मेहनतीच्या जोरावर उभारलेले असेल हे नक्की…!!!
*देव माय बाप म्हणजे शेती*
धन्यवाद 🙏🙏