मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* शिवसेना गटाने शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासनाने तालुका अध्यक्ष अशोक मेजर काळे
शेतकरी संघटनेने घेतली माघार* ! ऍड अजितदादा काळे
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
शिवसेना गटाने
शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आश्वासनाने
*शेतकरी संघटनेने घेतली माघार* ! ऍड अजितदादा काळे
नेवासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने वरिष्ठांशी संपर्क साधून भविष्यात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे दिलेल्या आश्वासनामुळे नेवासा तालुक्यातील विधानसभेची उमेदवारी अर्ज एडवोकेट अजित दादा काळे यांनी मागे घेतलेला आहे .
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांपैकी प्रामुख्याने संपूर्ण कर्जमाफी,दिवसा बारा तास वीज मिळणे,सर्व शेतमालाच्या उत्पादनांना हमीभाव देणे ,दुधाला चाळीस रुपये हमीभावाचा कायदा करणे आणि महत्त्वाचे म्हणजे हमीभाव केंद्र चालू करणे या मागण्या मान्य केल्याने माघार घेण्यात आलेली आहे .शेतकरी संघटना प्रामुख्याने वैयक्तिक राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असते .परंतु व्यवस्थेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे .त्यामुळे सर्व प्रकारच्या निवडणुका शेतकरी संघटना भविष्यात देखील लढविणार आहेच .परंतु शेतकरी हित लक्षात घेऊन कुठे पुढे चालायचे व कुठे थांबायचे ह्या गोष्टी कधी कधी लक्षात घ्याव्या लागतात .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष देण्याचे कबुल केले म्हणून शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक मुखाने निर्णय घेऊन थांबण्याचे ठरविले .
https://youtube.com/channel/UCq-aKbcVC2bxCQ7zVsURDQg?si=dI_OMsTen2Unpw7A
नेवासे तालुक्यात एडवोकेट अजित दादा काळे हे काय भूमिका घेतात यावर प्रस्थापित व विस्थापित अशा सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले होते . नेवासे तालुक्यात गावोगावी शेतकरी संघटनेच्या शाखा स्थापन झालेल्या आहेत . शेतकरी संघटनेची प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताकद देखील निर्माण झालेली आहे .मुळातच शेतकरी संघटना ही एक आंदोलक संघटना आहे आणि शेतकरी प्रश्नांना न्याय मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे .या उद्दिष्टाला अनुसरून शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे
खालील लिंक ला क्लिक करून सविस्तर यूट्यूब चैनल ची बातमी पाहू शकता
.https://youtu.be/52UL3KtXjCs?si=pGze-qDTZ75Sl-gG