Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषीवार्तातहसीलदेश-विदेशनिवडणूकनेवासा तालुकापंचनामापोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुंबईराजकियविमा कंपनीशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंवाद विधानसभा

आमदार विठठलराव लंघे पाटलांच्या  विजयासाठी ठरली अनमोल मदत *ऍड अजितदादा काळे* यांची !

नेवासा तालुक्यातील संघर्षमय राजकारणामध्ये आमदार विठ्ठलराव लंघे यांचा विजय खेचून आणण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली .

0 2 2 1 8 9

 

आमदार विठठलराव लंघे पाटलांच्या 

विजयासाठी ठरली अनमोल मदत *ऍड अजितदादा काळे* यांची !

नेवासा – नेवासा तालुक्यातील संघर्षमय राजकारणामध्ये आमदार विठ्ठलराव लंघे यांचा विजय खेचून आणण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली .

एडवोकेट अजित दादा काळे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र बरोबरच नेवासा तालुक्यात शेतकरी समस्यांकरता कार्यशील आहेत .जायकवाडी पट्ट्यातील विजेचा प्रश्न असो ,जळालेल्या ट्रान्सफार्मर चा प्रश्न असो, चोरी गेलेल्या वीज वाहक तारांचा प्रश्न असो ,अतिवृष्टी अनुदान,पीक विम्याचा प्रश्न असो असे अनेक शेतकरी हिताचे प्रश्न सन्माननीय अजित दादा काळे यांनी हाताळलेले आहेत . या तालुकास्तरीय प्रश्नांबरोबरच दुधाला अवघा 23 रुपये लिटर भाव असताना राज्यस्तरीय आंदोलनाची सुरुवात श्रीरामपूर येथील हरेगाव फाट्यापासून त्यांनी केली .त्यानंतर सरकारला तीस रुपये प्रति लिटर भाव आणि पाच रुपये शासकीय अनुदान देणे भाग पाडले .यावरच न थांबता त्यांनी 40 रुपये प्रति लिटर हमीभावाचा कायदा व्हावा म्हणून प्रयत्न चालू केले .दुधाव्यतिरिक्त केवळ पोर्टल बंद झाले म्हणून मागील दोन शासकीय कर्जमाफीतून हुकलेल्या शेतकऱ्यांसाठी संभाजीनगर उच्च न्यायालयात लढा देऊन वंचित शेतकऱ्यांना 5800 कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी मिळवून दिली .याबरोबरच श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील आकारी पीडित शेतकऱ्यांचा प्रश्न आत्मीयतेने न्यायालयीन लढाई देऊन एकही रुपया न घेता सोडविला .त्यासाठी ते वंचित शेतकऱ्यांसह रस्त्यावर देखील उतरले .अखेरीस वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि 7500 हजार एकर शेतजमिन सरकारी ताब्यात सुमारे 110 वर्षांपासून असलेली परत मिळणार आहे . त्याचप्रमाणे नेवासे तालुक्यात चार मंडळे वगळलेली असतानाकायदेशीर पाठपुरावा करून व उपोषणाचे हत्यार उपसून सुमारे 88 कोटीचा पिक विमा त्यांनी मिळवून दिला .तसेच 2022 च्या नेवासे तालुक्यातील 443 वंचित शेतकऱ्यांना एचडीएफसी आरगो या कंपनीवर आणि प्रशासनावर वेळप्रसंगी पोलीस केसेस दाखल करून सुमारे 42 लाख 40 हजार 342 रुपयांचा पिक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला .

या संपूर्ण पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांकडून राज्यभरातून त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी होऊ लागली .त्यामुळे शेतकरी संघटनेतर्फे नेवासा विधानसभा मतदारसंघ निवडण्यात आला व त्यांचा अर्ज देखील भरण्यात आला .ही उमेदवारी शेतकऱ्यांच्या प्रमुख पाच मागण्यां करिता होती .त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी , विज बिल माफी , शेती पंपाला दिवसा वीज,हमी भावाची केंद्रे प्रत्येक ठिकाणी उभारणे,दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर हमी भावाचा कायदा करणे आणि अन्य शेतकरी हिताच्या मागणी करता ही उमेदवारी करण्यात आलेली होती .परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याच मागण्यांची भूमिका घेऊन निवडणूक रिंगणात उतरले .अशावेळी केवळ शेतकरी हित लक्षात घेऊन आणि संघटनेच्या भूमिका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दिसून आल्याने अजित दादा काळे यांनी थांबण्याची भूमिका स्वीकारली .त्यांच्या ह्या सामंजस्याने व शेतकरी हित लक्षात घेऊन थांबण्याच्या भूमिकेने आज एकनाथजी शिंदे यांचे पारडे जड झाले आणि विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली . अन्यथा मतांचे विभाजन होऊन तालुक्यामध्ये वेगळे चित्र दिसून आले असते .

यावर भाष्य करताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित दादा काळे यांनी सांगितले की भविष्यात आमदार विठ्ठलराव लंघे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे वरील सर्व शेतकरी हिताच्या मागण्यांचा आपण पाठपुरावा करणार असून नेवासा तालुक्याला सह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हिताची भूमिका बजावणार आहे . याकरिता नेवासे तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या टीम सह राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

त्यांच्या या भूमिकेबद्दल श्री विठ्ठलराव लंघे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी संघटनेचे आणि अजित दादा काळे यांचे मनःपूर्वक आभार मानलेले आहेत .

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे