अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी याचिका
शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुसार करण्यासाठी नियमानुसार येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांची आवास योजनेच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी संघटनेची प्रांत उपाध्यक्ष तथा संभाजीनगर उच्च न्यायालय नामांकित विशेष अडवोकेट अजित काळे साहेब यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे

अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी याचिका
टाकळीभान प्रतिनिधी. शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमण नियमानुसार करण्यासाठी नियमानुसार येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांची आवास योजनेच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी संघटनेची प्रांत उपाध्यक्ष तथा संभाजीनगर उच्च न्यायालय नामांकित विशेष अडवोकेट अजित काळे साहेब यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे खंडपीठाने यावर राज्य शासनाच्या नुकतीच नोटीस काढली आहे सरकारी जागेवर गेल्या अनेक वर्षापासून घर घर करून वास्तव करत असलेल्या नागरिकावर राहत्या जागेचा हक्काचा उतारा मिळत नसल्याची सरकारी सुविधा चा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे गरीब कुटुंब या योजनेच्या अनुषंगाने त्यांना सरकारी लाभ मिळत नाही व तसेच हक्काची घराची नोंद प्राप्त होत नाही. त्यामुळे घरकुलाच्या जाचक अटी लागू करण्यात आले असले कारणे बरेच लाभार्थी वंचित आहेत. ही जाचक अटी रद्द व्हाव्यात आणि कायमस्वरूपी निवासी उतारा त्यांना प्राप्त व्हावा अतिक्रमण झालेल्या जागेचा फायदा लाभार्थ्यांना मिळावा तसेच अतिक्रमण नियमित करून त्यांना त्या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते यासाठी त्यांनी न्यायालयीन लढा लढण्याचे ठरवले. त्यासाठी नामांकित वकील तसेच संभाजीनगर हायकोर्ट या ठिकाणी माननीय अजित काळे साहेब यांनी त्यांचे वकीलपत्र घेऊन न्यायालयीन लढा बाजू मांडण्याचे काम करणार असल्याचे समाधान व्यक्त करत असल्याचे लाभार्थी यांनी समाधान व्यक्त केले. शिंदे यांना अजित काळे साहेब यांनी साथ देण्याचे कबूल केले. माननीय अजित काळे यांनी खंडपीठात न्यायालयीन लढाई लढत असताना विनामूल्य सहकार्य करण्याची त्यांना कबूल केली असून पुढील कारवाई सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित काळे साहेब यांनी श्रीरामपूर तालुक्यातील काही गावातील लाभार्थ्यांची प्रश्न हाती घेऊन त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्यासाठी त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्याचे फलित असे की न्यायालयाने सरकारला नोटीस काढून पुढील स्पष्टीकरण देण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. त्यामुळे बऱ्याच दिवसाचे गोरगरीब या योजनेपासून वंचित असल्याने त्यांना लवकरच दिलासा देण्याची काम त्यांनी हाती घेतल्या असून एक आशेचा किरण गोरगरिबांच्या घर स्वप्नपूर्तीसाठी न्यायालयीन लढाव्या नेता अजित काळे साहेब विशेष प्रयत्न करीत आहेत . अशी आमच्या प्रतिनिधी शिंदे यांनी सांगितले आहे.