Breaking
ब्रेकिंग

जनजागृती अभियान* 

मित्रांनो आज आपण नोटरी विषयी माहिती पाहणार आहोत* 

0 2 2 1 9 6

 

*जनजागृती अभियान*

*मित्रांनो आज आपण नोटरी विषयी माहिती पाहणार आहोत*

 

नेवासा प्रतिनिधी  आपण नोटरी डॉक्युमेंट करणेसाठी जाता तेव्हा किती फी देता? त्याची पावती घेता का? नोटरी बोगस तर नाही ना?

 

नोटरीची नियुक्ती ही 

सरकार करते जेणे करून नागरिकांना लहान सहान करार मदार करणे साठी, साक्षांकित प्रती करणे साठी सोईस्कर होईल. नागरिकांचा तसेच सरकारी नोंदणी अधिकारी यांचा वेळ वाचेल.

 

*नोटरी कायदा 1952* आणि *नोटरी नियम 1956* मधील कलम / नियम विचारात घेऊन *दस्तऐवज साक्षांकित करणे,* *नियम 10 नुसार फी आकारणे हे अपेक्षित आहे.* परंतु काही नोटरी हे अवाजवी फी आकारात आसतात त्यामुळे *शासनाने परिपत्रके काढून फी निश्चित केलेली आहे.*

 

“`आपण खालील विविध नोटरी संबंधित परिपत्रके पाहू शकता.“`

 

 

नोटरी अधिनियम १९५२ मधील कलम ३ नुसार व नोटरी नियम १९५६ नुसार नोटरीची नियुक्ती करण्यात येते.

 

*नोटरीच्या नियुक्तीसाठी वकीली व्यवसायाचा १० वर्षांचा अनुभव लागतो.* (महीला, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय साठी *किमान ७* वर्षांचा अनुभव लागतो ) नोटरीची एकदा नियुक्ती झाल्यावर *दर ५ वर्षांनी नोटरीना मुदतवाढ देण्यात येते* त्यासाठी नोटरी ने दर पाच वर्षांनी *आपले सर्टिफिकेट रीन्यू केले पाहिजे.*

 

नोटरीची नियुक्ती झाल्या नंतर शासन त्यांना *कोणतेही मानधन देत नाही.* परंतु ते *शासनाने निश्चित केलेली फी नागरिकांकडून घेऊ शकतात.*

 

सामान्य जनतेला एखाद्या *नोटरीच्या विरुध्द कारवाई/ तक्रार* करायची असल्यास *नोटरी अधीनियम 1956* मधील *नियम 13* नुसार सक्षम प्राधीकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करु शकता.

 

*नोटरी विरुध्द कारवाई करावयाचे आधीकार*

 

*सहसचिव तथा सक्षम प्राधीकारी, विधी आणि न्याय विभाग, रूम नंबर 304 (मुख्य),* *3 रा मजला, राजगुरू हुतात्मा चौक, मादाम कामा रोड, मांत्रालय, मुंबई– 32. दूरध्वनी* *क्रमाांक.(022) 22028619* 

*यांना आहेत. तेव्हा आपण त्यांच्याकडे रीतसर तक्रार करू शकता.*

 

“`नोटरी फी ही खालील प्रमाणे अकारावी“`

 

*असे परिपत्रक क्रमांक विवन्यावि-2012/नोटरी/ई-शाखा दिनांक १३/०४/२०१२ नुसार निश्चित केले आहे*

 

१)रुपये १०००० पर्यंतचा करार नोंदवायचे(नोटरी करणेसाठी) साठी रुपये ३५

 

२)दहा हजार ते २५००० साठी रुपये ७५/

 

३) २५००० ते ५०००० साठी रुपये १००/-

 

४) ५०००० चे पुढे जास्तीत जास्त रुपये १५०/-

 

५) साक्षांकित प्रती साठी रुपये ५/- प्रती पान (कमीतकमी रुपये १०/-)

 

वरील परिपत्रकामध्ये आपण सर्व चार्जेस बाबत माहिती घेऊ शकता.

 

वरील प्रमाणे रुपये ३५/- ते रुपये १५०/- म्हणजेच जास्तीत जास्त रुपये १५०/- एवढाच आकार नोटरी घेऊ शकतात.

 

कित्येक नोटरी हे काही हाई कोर्टात, सुप्रीम कोर्टात दाखल करायचे कागद पत्रे, काही करार नामे यांच्या साठी वरील पेक्षा खूप जास्त फी मागतात आणि नागरिकांना याची माहिती नसते त्यामुळे तेही नविलाजने देतात.

आपणास माहीत आहे का *नोटरी ने अकारलेल्या फिची पावती द्यावी असेही शासनाने बंधन नोटरी वर घातले आहे.*

 

आपण ज्या नोटरीची सर्व्हिस घेत आहात त्या *नोटरी चे सर्टिफिकेट ची मुदत संपलेली नाही ना याची नक्की खात्री करा,* शिवाय सदर नोटरी हे खरे आहेत की बोगस आहेत याची माहिती घ्या .

 

 

जर नोटरी बोगस आहे, सर्टिफिकेटची मुदत संपलेली आहे तर आपण त्यांची तक्रार वरील पत्यावर जरूर करा आणि आपल्या बरोबर इतर ग्राहकांना, नागरिकांना फसवणुकीपासून वाचवा.

 

*नोटरी ने त्यांना मंजूर केलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे असेही शासनाने नमूद केले आहे* . जर त्यांनी त्यांच्या कर्यक्षेत्राबाहेर काम केले तर शासनाकडे तक्रार केल्यावर त्यांचे वर कायदेशीर कारवाई होते आणि *त्यांचे सर्टिफिकेट ही काढून घेतले जाऊ शकते.*

 

तेव्हा ग्राहकांनी सजग बनले पाहिजे. सरकार सरकार म्हणजे कोण? *जनता हीच सरकारची मालक आहे.* *बिनधास्त पुढे या, सोशल मीडिया चा वापर करा आणि लिहायला, तक्रार लेखी, ईमेल ने द्यायला शिका तरच देश बदलेल.*

हे असेच चालायचे आपला देशाची व्यवस्था खूप भ्रष्ट झाली आहे असे रडगाणे गाण्या पेक्षा आपण ती सुधारूयात. चला व्यवस्था बदलू यात.

 

*Dipak Pachpute*

*(संविधान प्रसारक)*

 

*LAW IS A VERY POWERFULL WEAPON*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे