Breaking
अहमदनगरकृषीवार्तातहसीलपंचनामापोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगविमा कंपनीशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

प्रलंबित पीक विमा ची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा शेतकरी संघटना, नेवासा तालुक्याचे यश*.. श्री अशोक मेजर काळे तालुका अध्यक्ष .

एडवोकेट अजित दादा काळे यांनी उपोषणाचे कायदेशीर हत्यार उपसले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली .त्यानंतर अवघ्या 72 तासाच्या आत कंपनीने 443 वंचित शेतकऱ्यांची यादी एन सीआयपी पोर्टलला सादर केली

0 2 2 1 8 8

 

*प्रलंबित पीक विमा ची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा शेतकरी संघटना, नेवासा तालुक्याचे यश*💐💐🎯💪🏻

=======================

*नेवासा ( प्रतिनिधी* ) खरीप 2022 23 पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नेवासे तालुक्यात अनेक शेतकरी पात्र असताना देखील वंचित होते .या शेतकऱ्यांनी अनेक महिने कृषी अधिकारी तहसील कार्यालय आणि कंपनीचे उंबरठा झिजविले .परंतु काहीही उपयोग झाला नाही .अखेरीस त्यांनी नेवासा तालुका शेतकरी संघटने कडे धाव घेतली नंतर शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर विमा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले गेले .त्यासाठी महत्त्वाची भूमिका जिल्हाध्यक्ष अनिलराव अवताडे जिल्हा उपाध्यक्ष हर आप्पा तुवर युवा अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी तालुकाध्यक्ष मेजर काळे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागवडे संपर्कप्रमुख नरेंद्र पाटील काळे कायदेशीर सल्लागार एडवोकेट बाळासाहेब कावळे आणि सर्व पदाधिकाऱ्यां बरोबरच पाचेगाव येथील श्री अजित किसन तुवर व श्री हरिभाऊ जगताप यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली .

सर्वप्रथम एचडी एफसी  आरगो कंपनीकडे ,कृषी अधिकाऱ्यांकडे आणि तहसीलदारांकडे सर्व प्रकरणे शेतकरी संघटनेतर्फे पुनश्च सादर करण्यात आली .त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांची दिसून आलेली दप्तर दिरंगाई सहन न झाल्याने एडवोकेट अजित दादा काळे यांनी सदर कंपनी विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले .त्यानुसार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे सदर एचडीएफसी आरगो कंपनी विरोधात व तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यास गेले .परंतु तेथे देखील गुन्हा दाखल करण्याची मानसिकता दिसून न आल्या कारणाने स्वतः एडवोकेट अजित दादा काळे हे पोलीस स्टेशनमध्ये आले .नंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची या प्रश्नावरून बाचाबाची झाली व अखेरीस एडवोकेट अजित दादा काळे यांनी उपोषणाचे कायदेशीर हत्यार उपसले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली .त्यानंतर अवघ्या 72 तासाच्या आत कंपनीने 443 वंचित शेतकऱ्यांची यादी एन सीआयपी पोर्टलला सादर केली आणि त्वरित शेतकऱ्यांचे हक्काचे विम्याचे पैसे बचत खात्यात जमा झाले .

सदर आंदोलनात शेतकरी संघटनेचे श्रीहरी आप्पा तुवर ,मेजर अशोक काळे , डॉ रोहित कुलकर्णी , एडवोकेट बाळासाहेब कावळे ,श्री नरेंद्र पाटील काळे ,श्री बाबासाहेब नागोडे दत्तू पाटील निकम, जिल्हा संघटक बाबासाहेब खराडे, किरण दादा लंघे श्री विश्वासराव मते ,श्री कैलास पवार , अशोक कारखान्याचे संचालक शांताराम तुवर,श्री भास्कर तुवर, हरिभाऊ जगताप भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे सोमनाथ औटी, दादासाहेब नाबदे व,सुधाकर देशमुख, धनंजय कंक, दत्तू पाटील लांडे, अनिल मते, पुरुषोत्तम सर्जे,, सुरेगाव गंगा गावातील शेतकरी व सरपंच महेश शिंदे संजय ठुबे, शेतकरी संघटना नेवासा शहराध्यक्ष प्रदीप नवले, सागर पाटील लांडे, बापूसाहेब देशमुख, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, शरद आसने, बेल पिंपळगाव शेतकरी, पाचेगाव ,पुणदगाव , नेवासा बुद्रुक,व त्यांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले . नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे व राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित दादा काळे यांचे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे व आभार मानले जात आहेत .यानंतर एचडी एफसी आरगो कंपनीकडून 2022 23 खरीप विमा योजनेतील बाऊन्स चेक संपूर्ण नगर जिल्ह्यातील मिळवून देण्याचा मनोदय डॉ रोहित कुलकर्णी यांनी मांडला .

त्याचप्रमाणे एडवोकेट अजित दादा काळे यांनी खरीप 2023 24 च्या ओरिएंटल कंपनीकडून प्रलंबित असलेला विमा मिळवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्याचे सुतोवाच केलेले आहे आमच्या प्रतिनिधी शी माहिती प्राप्त झाली.

 

1.5/5 - (4 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे