यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.जिल्हा अहिल्यानगर रा.घर नं.155, पाईपलाईन हडको एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर ▶️ *लाचेची मागणी*

नेवासा प्रतिनिधी: अहिल्यानगरमध्ये तलाठ्यावर लाचखोरीचा फास – रंगेहात अटक
अहिल्यानगर: शेतजमिनीच्या वारस नोंदीसाठी 3,000 रुपयांची लाच घेताना पाडळी आळे (ता. पारनेर) येथील तलाठी आशीर्वाद प्रभाकर घोरपडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.
तक्रारदाराच्या आत्याच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या वारस नोंदीसाठी आवश्यक प्रक्रिया करण्याकरिता घोरपडे यांनी 5,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 24 मार्च रोजी सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान तलाठ्याने 3,000 रुपये लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
सदर कारवाई अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या देखरेखीखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड आणि दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी तलाठ्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी हे घोरपडे यांचे सक्षम अधिकारी असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक:
📞 0241-2423677
📞 टोल फ्री: 1064
जिल्हा अहिल्यानगर रा.घर नं.155, पाईपलाईन हडको एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी*
*यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट -*अहिल्यानगर.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय- 35 वर्षे
▶️ **आलोसे* – आशीर्वाद प्रभाकर घोरपडे, वय – 34 वर्ष, पद – तलाठी सजा पाडळी आळे, ता.पारनेर,
जिल्हा अहिल्यानगर रा.घर नं.155, पाईपलाईन हडको एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर
▶️ *लाचेची मागणी*
3,000/- रुपये.
दिनांक -24/03/2025
▶️ **लाच स्विकारली*
3,000/ रुपये
दिनांक -24/03/2025
▶️ **हस्तगत रककम* –
3,000/-रुपये
▶️ *लाचेचे कारण*
तक्रारदार हे पाडळी आळे, ता.पारनेर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आत्या ह्या शेजारच्या कळस ता.पारनेर या गावच्या मूळ रहिवासी असून त्या अशिक्षित आहेत. कळस येथे तक्रारदार यांच्या आत्याचे पती यांचे नावे शेत जमिनीचे गट क्रमांक 37 व गट क्रमांक 48 असे दोन गट आहेत. तक्रारदार यांच्या आत्याचे पती हे दिनांक 6/8/2023 रोजी मयत झाले होते. तक्रारदार यांचे आत्याच्या पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीला वारसदार आहेत. सदर शेत जमिनीला वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळीचे तलाठी यांच्याकडे सर्व संबंधित कागदपत्रे एक महिन्यापूर्वी जमा केली होती. तक्रारदार यांच्या आत्या ह्या अशिक्षित तसेच वयोवृद्ध असल्याने व तक्रारदार यांचा आते भाऊ हा पनवेल नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या कळस येथील शेत जमिनी बाबतच्या वारस नोंदीच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांच्या आत्या यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले आहे. सदर वारस नोंद लावण्याकरिता लोकसेवक घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार दि.24/03/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.24/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक आशीर्वाद प्रभाकर घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे, ता.पारनेर यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे शेत जमिनीची वारस नोंद लावण्यासाठी 3,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.24/03/2025 रोजी पाडळी आळे, तलाठी कार्यालय, ता.पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक घोरपडे यांनी तक्रारदार यांचे कडून 3,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पारनेर पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ **सापळा व तपास अधिकारी*
श्रीमती छाया देवरे,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.8788215086
▶️ **सापळा पर्यवेक्षण अधिकारी**
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर, मो. क्र .8329701344
▶️ *सापळा पथक*
पोलीस नाईक चंद्रकांत काळे,
पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक* –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* मा.जिल्हाधिकारी, अहिल्यानगर
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.
*@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================