कारखाना बचाव कृती समितीला यश
सभासदांकडून समितीच्या अभिनंदनाचा ठराव संमत..!
📌कारखाना बचाव कृती समितीला यश..!
📌सभासदांकडून समितीच्या अभिनंदनाचा ठराव संमत..!
राहुरी -प्रतिनिधी — डॉ. तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी यांनी 22 लक्ष रुपये भरले असुन हा कारखाना बचाव कृती समितीचा फार मोठा विजय आहे. अखेर कारखाना व सभासदांच्या व कामगारांच्या मालकीचा ठेवण्यात यश आल्याने सभासदांनी अभिनंदनचा ठराव मंजूर केला. या कारखाना बचाव कृती समितीसाठी तालुक्यातील माननीय अरुण पाटील कडू, पंढरीनाथ तात्या पवार, अर्जुनराव म्हसे पाटील, संजय राव पोटे, भरत पाटील पेरणे, संभाजी राजे तनपुरे, सुखदेवराव मुसमाडे, किरण पाटील कडू, किशोर भांड, सुरेशराव धुमाळ, संचालक बाळासाहेब गाढे, सुधाकर शिंदे, विलास गागरे, आप्पासाहेब ढूस, सुधाकर कराळे, बाळासाहेब बोर्डे, साहेबराव तरवडे, विनायकराव भुसारे, रवींद्र मोरे, सतीश पवार, अनिल जठार, नारायणराव टेकाळे, ताराचंद तनपुरे, अनिल पेरणे, अजित जाधव, दत्तू पाटील जाधव, सोमनाथ जाधव, ज्ञानदेव पोटे, चंद्रकांत कराळे, कोंडाजी विटनोर, अदिसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे याचिका कर्ते अमृत धुमाळ तसेच भरत पेरणे संजय पोटे आदीं याचिकाकर्त्यांचा कारखाना निवडणूक घेण्यासाठी कारखाना सभासद व कामगारांचा मालकीचा राहावा यासाठी उच्च न्यायालय औरंगाबाद इथे न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याला अनुसरून में औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी दीपक पराये यांनी कारखाना निवडणूक घेण्यासाठी 22 लक्ष रुपये प्रादेशिक सहसंचालक साखर अहमदनगर यांच्याकडे निवडणूक घेण्याकरिता रक्कम आरटीजीएस ने अदा केली आहे. उक्त नमूद संस्थेवर अवसायनाची कारवाई करण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्यावर जिल्हा बँकेने केलेली कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. त्याची सुनावणी औरंगाबाद खंडपीठापुढे दिनांक 11.10.2024 रोजी होणार आहे. याचिका कर्त्यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठाचे विधीज्ञ अँड अजित काळे साहेब, वसंतराव दिगंबर, साळुंखे साहेब, अँड साक्षी काळे, अँड प्रतीक तलवार व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. याचिका कर्त्यांच्यावतीने वरील सर्वजण काम पाहत आहेत त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले असल्याने राहुरी तालुक्यामध्ये सभासद शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील सर्व सभासद व कामगारांनी अमृत धुमाळ अरुण कडू राजेभाऊ शेटे भरत पेरणे संजय पोटे व इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
प्रसंगी अमृत धुमाळ, आप्पासाहेब ढूस, पंढरीनाथ पवार, संभाजी राजे तनपुरे, संजय पोटे, भरत पाटील, विनायकराव भुसारे, चंद्रकांत कराळे, भगवानराव गडाख, सुखदेवराव मुसमाडे, दिलीपराव इंगळे, रवींद्र मोरे आदींनी आपल्या मनोगत व्यक्त केले.