Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्तातहसीलनेवासा तालुकापंचनामापोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगमहाराष्ट्रविमा कंपनीशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

नेवासा तहसिल व कृषि कार्यालय येथे *शेतकरी संघटनेचे ढोल बजाव आंदोलन

खरिप 2023 पंतप्रधान पिक विमा शेतकऱ्यांच्या बचत खात्यात विनाविलब जमा करावा यासाठी एडवोकेट अजित दादा काळे यांच्या सूचनेनुसार शेतकरी संघटनेचे ढोल बजाव आंदोलन झाले .

0 2 2 2 3 3

oo

नेवासा तहसिल व कृषि कार्यालय येथे

*शेतकरी संघटनेचे ढोल बजाव आंदोलन*

———————————————–

नेवासा -(प्रतिनिधी)  खरिप 2023 पंतप्रधान पिक विमा शेतकऱ्यांच्या बचत खात्यात विनाविलब जमा करावा यासाठी एडवोकेट अजित दादा काळे यांच्या सूचनेनुसार शेतकरी संघटनेचे ढोल बजाव आंदोलन झाले .

माननीय तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांची विमा  प्रश्न निवेदन देताना

नेवासे तालुक्यातील नेवासा बुद्रुक सोनई चांदा व कुकाना या चार मंडळांना शासकीय दप्तर दिरंगाई मुळे अद्याप पर्यंत 25% अग्रीम विमा देखील मिळू शकलेला नाही शकलेला नाही .त्यासाठी व पुढील विमा मिळण्यासाठी शेतकरी संघटनेला फार मोठा संघर्ष करावा लागला . मोबाईलला शेतात रेंज नसणे , वेळेवर लाईट नसणे यामुळे व बरेचसे शेतकरी अन्ड्रॉइड साक्षर नसल्याने ऑनलाईन तक्रार करू शकत नाही . याचा फायदा विमा कंपनी घेते . त्यामुळे21 दिवसांपेक्षा जास्त कालखंड पाऊस न पडल्याने उंबरठा उत्पन्नात सामुहिक घट धरून विम्याचे निकष लावावेत याकरीता शेतकरी संघटना आग्रही होती कि जे णे करून प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळेल .अहमदनगर जिल्ह्यात एकूण 11 लाख 85 हजार शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पिक विमा उतरवलेला आहे . एकून 2 क्लस्टर पैकी प्रथम क्लस्टर मध्ये अहमदनगर , नाशिक व चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे . अहमदनगर जिल्ह्यासाठी 667 कोटी रु रक्कमेची शासनाकडून गरज आहे. आता जरी समाज माध्यमात राज्य सरकारने 1927 कोटी रुपये ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीलादिले असल्याची बातमी असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बचत खात्यात सदर कमी येईपर्यंत अनंत अडचणी असतात .तसेच पुनश्च शासकीय दप्तर दिरंगाई होऊ नये आणि कोणत्याही शेतकऱ्याला विमा रक्कम काही तांत्रिक अडचणीमुळे मिळू न शकल्यास तहसील व कृषी कार्यालयाने एक प्लॅटफॉर्म उभे करावे की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला विमा रकमेचा लाभ मिळू शकेल अशी सूचना शेतकरी संघटनेने केलेली आहे . त्यानुसार तहसिल कार्यालयातील प्रशिक्षणार्थी अधिकारी श्री विशाल यादव साहेब यांनी शेतकऱ्यांना सर्वोतपरी सहकार्य करून प्रत्येकाचा विमा मिळवून देण्याची भुमिका दर्शविली . त्यामुळे कोणाचे बचत खात्यास आधार सिडींग नसणे , यादिमध्ये नाव न येणे , विमा रक्कम कमी येणे अशा अडचणींवर मात करण्यासाठी स्वतंत्र टेबल लावण्याची सुचचना शेतकरी संघटनेने तहसिल व कृषि कार्यालयात केलेली आहे . यानंतर शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी कृषी अधिकारी श्री हिरवे साहेब यांच्याकडे देखील ढोल बजाव आंदोलन घेऊन गेले व त्यांना देखील या प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत .त्यामुळे आता येणाऱ्या पिक विमा संदर्भात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नेवासा तालुका शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही .

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे , उपजिल्हाध्यक्ष हरि अप्पा तुवर , तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे , युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी , बाबासाहेब नागोडे , नरेंद्र पा . काळे, अॅड बाळासाहेब कावळे , अजित तुवर , सोपानराव आगळे, कैलास तुवर , दत्तु पा निकम , विश्वासराव मते व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .

खालील दिलेल्या युट्युब लिंक ला क्लिक करून बातमी सविस्तर पाहू शकता आमच्या चॅनलला

2/5 - (3 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे