Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकायदा आणि प्रशासनकृषी कायदाजयंती राष्ट्रीय पुरुषांचीजिल्हा परिषद अहिल्यानगरजिल्हाधिकारीदेश-विदेशनेवासा तालुकापुरस्कारपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहा पारेषण कंपनी विद्युत मंडळमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईमुंबई उच्च न्यायालयलाच लुचपत आणि भ्रष्टाचारवैद्यकीय आरोग्य विभागशासन निर्णय बायोमेट्रिक हजेरी शासन निर्णयशिबिरसांस्कृतिक कार्यक्रमस्वातंत्र्य दिनहुकूमशाही

जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांची उंची – डीवायएसपी संतोष खाडे यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश”

“मी ऊसतोड कामगाराचा मुलगा असूनही आज डीवायएसपी पदावर कार्यरत आहे. हे पद मिळवताना इंग्रजी माध्यम, शहरी भाग वा श्रीमंती यांचा अभाव कधीच आडवा आला नाही. जिद्द, चिकाटी व आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन शिक्षण घेतल्यास कोणतीही उंची गाठता येते,” असे त्यांनी सांगितले.

0 2 2 2 3 3

जिद्द, चिकाटी आणि स्वप्नांची उंची – डीवायएसपी संतोष खाडे यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश”

 

बातमी:

भानसहिवरे (ता. नेवासा) येथील प्राथमिक शाळेत आयोजित स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात बोलताना डीवायएसपी संतोष खाडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. “मी ऊसतोड कामगाराचा मुलगा असूनही आज डीवायएसपी पदावर कार्यरत आहे. हे पद मिळवताना इंग्रजी माध्यम, शहरी भाग वा श्रीमंती यांचा अभाव कधीच आडवा आला नाही. जिद्द, चिकाटी व आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेऊन शिक्षण घेतल्यास कोणतीही उंची गाठता येते,” असे त्यांनी सांगितले.

 

खाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शाळेत नियमित उपस्थित राहणे, शिक्षकांनी दिलेले स्वाध्याय पूर्ण करणे, आई-वडिलांना मदत करणे, चांगले बोलणे व वाईट वागणुकीपासून दूर राहणे, हेच यशाचे मूळ सूत्र आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनातील छोट्या पण महत्त्वाच्या प्रश्नांवर जागरूकता वाढवण्यासाठी प्रश्न विचारले – “टीव्ही पहाणार का?”, “टुकार मुलांबरोबर फिरणार का?”, “भांडण करणार का?”, “पुस्तके फाडणार का?” अशा प्रश्नांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या सकारात्मक उत्तरांमुळे संपूर्ण परिसर टाळ्यांच्या कडकडाटात निनादला.

 

कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, सरपंच अशोकशेठ बोरा, शिक्षण विस्तार अधिकारी रुकसाना शेख, केंद्रप्रमुख सुखदेव सोनवणे, डॉ. जे. ई. नरवडे, डॉ. संतोष ढवाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. अशोक भोईटे, माजी मुख्याध्यापिका सुनंदा इधाटे, मुख्याध्यापक रामचंद्र गजभार, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कीर्तने व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

या सोहळ्याच्या निमित्ताने पहिलीच्या नवख्यांसह चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ढोल पथकाच्या गजरात मिरवणूक काढून शाळा प्रवेशोत्सव व निरोप समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी किशोर जोजार यांनी विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये किमतीचे दप्तर, पाटी व अंकलिपीचे साहित्य वाटप केले. तर दत्ता शेठ नवले (मातोश्री हॉटेल) यांनी सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांसाठी सुरस भोजनाची व्यवस्था केली.

 

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. रेवणनाथ पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.

 

(केंद्रबिंदू : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवणारा प्रेरणादायी संदेश)

 

 

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे