Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्तादेश-विदेशनिवडणूकपंचनामाब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुंबईराजकियविमा कंपनीवैद्यकीय आरोग्य विभागशिबिरशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंपादकीयसंवाद विधानसभास्वातंत्र्य दिनहुकूमशाही

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संबंधी माझी भूमिका*

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संबंधी माझी भूमिका*

0 2 2 2 3 3

मत ठरवताना याचाही विचार करा!

*महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी संबंधी माझी भूमिका*. … अमर

नेवासा (प्रतिनिधी) माझा पाठिंबा कोणत्याच पक्षाला नाही पण मला वाटते की, मोदी-शहा यांचा आशीर्वाद लाभलेल्या महाराष्ट्रातील सरकारला शेतकऱयांनी चांगली अद्दल घडवली पाहिजे.

हे लोक मतलबी आहेत, त्यांना त्यांच्या मतलबा पुढे शेतकरी स्वातंत्र्याचा मुद्दा गौण वाटतो. म्हणूनच त्यांनी सीलिंगच्या कायद्याला हात घातला नाही. शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष केले. शेतीमाल उत्पादकांची केंद्र व राज्य सरकारने मिळून वाट लावली आहे.

हे सरकार जातीयवाद आणि धर्मवाद करण्यात सरकारी यंत्रणेचा आणि सरकारी पैशाचा वापर करू लागले आहे. शेतकरी स्वातंत्र्याला सर्वात मोठा अडथळा या विषारी वातावरणाचा आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय नागरिकांनी मोदी-शहाला धडा शिकवला म्हणून केंद्रात मोदी-शहाची एकहाती सत्ता राहिली नाही. साप अर्धवट मेला तर तो डूख धरतो असे म्हटले जाते, त्या नुसार लोकसभेच्या निवडणुकीत अर्धवट मेलेला साप पूर्णपणे मारावा लागेल. महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातून गेल्या शिवाय त्यांना शेतकरी आठवणार नाही.

मोदी-शहाची ताकत वाढेल यासाठी काही ‘शेतकऱयांचे नाव घेऊन वावरणारे नेते’ दिशाभूल करण्याची शक्यता मला दिसत आहे. या लोकांना मोदी-शहाच्या पक्षाच्या नेत्यांकडून सुपारी मिळालेली असणार आहे, या बाबत किसानपुत्रानी काळजी घेतली पाहिजे. ते भूलथापा देऊन फसवणूक करू शकतात.

भावांनो आणि बहिणींनो, आपण संकटाच्या काळातून जात आहोत, कोणत्याच राजकीय पक्षाकडून किंवा गटाकडून अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. अशा परिस्थितीत आपण एकच करू शकतो, शेतकरी नाराज झाले तर ते तुमची सत्ता खाली खेचू शकतात, एवढेच दाखवून देऊ! आजच्या काळात लढाई पुढे नेण्याची, हीच एकमेव रणनीती असू शकते.

आगामी विधान सभा निवडणुकीत मी मोदी-शहाच्या बगलबच्यांना पराभूत करू शकेल अशा उमेदवाराला मतदान करीन.

अमर हबीब, आंबाजोगाई

किसानपुत्र आंदोलन

8411 909 909

2/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे