चलो जवळके –चलो जवळके
कोपरगाव तालुक्याचे भूमिपुत्र नानासाहेब जवरे यांचा शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश.
//नेवासा प्रतिनिधी चलो जवळके –चलो जवळके
शेतकरी संघटनेचा परिवर्तन मेळावा.
कोपरगाव तालुक्याचे भूमिपुत्र नानासाहेब जवरे यांचा शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश.
कोपरगाव तालुक्याचे भूमिपुत्र नानासाहेब जवरे यांचा शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश.
श्री जवरे यांचा अल्पसा परिचय
१)जन्म ०१ जून १९६८.
सन -१९८१ लां पहिले आंदोलन करून सामाजिक जीवनास सुरुवात.
२)१९९२ ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड.
३)सन -१९९७ साली पत्रकारितेस सुरुवात.
४) जवळके ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र गट स्थापन करून विना पैसे प्रस्थापितांच्या विरुद्ध बहुमताने विजय.
५)जवळके ग्रामपंचायतला ०१ लाखाहून अधिक वृक्ष लागवड त्याबाबत मोहन धारिया यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त,संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार,लोकराज्य ग्राम पुरस्कार,क्षयरोग निर्मूलना बाबत जिल्हास्तरीय पुरस्कार.
६) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नगर जिल्ह्यात स्थापना,दहा वर्ष कार्याध्यक्ष,सहा वर्ष जिल्हाध्यक्ष पद भूषवले.शिर्डीत नानासाहेब जवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत तीन राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न.
७) सन -२००२ साली गावकरी वर्तमानपत्राचा मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.साबळे यांच्या हस्ते ग्रामीण पत्रकार हा नाशिक येथे गौरव पुरस्कार.
८) २००९ साली अकोले येथे जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार.
९) सन -२०१० साली एम.आय.टी.पुणे येथे काकडी (शिर्डी )विमानतळ उभारणीसाठी महत्वपूर्ण योगदाना दिल्याबद्दल मनसे चे प्रदेशाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरव.
१०) कोपरगाव तालुक्यातील येसगाव पाट येथील माजी मंत्र्यांच्या गावात अवैध वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी सातत्याने लेख लिहून अखेर बंद पाडला तालुक्यातील अनेक महिला आणि तरुणांना दिलासा.त्याबद्दल राहुरी येथील महात्मा फुले सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार.
११) उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ उभारणीत महत्वपूर्ण योगदान व आद्य प्रवर्तक.
१२) कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी १३ गावांना वरदान ठरणाऱ्या उजनी उर्फ रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजनेच्या आंदोलनात महत्वपूर्ण योगदान युती शासनाच्या काळात १९९७ त्यास मंजुरी. व विविध विकास कामे.
१३) उत्तर नगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी १८२ गावातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी गत १८ वर्षापासून सतत आंदोलन,संघर्ष,उच्च न्यायालय संभाजीनगर येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या सहकार्याने उच्च व सर्वोच्च न्यायालयात लढा.
१४) निळवंडे लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या राहाता व कोपरगाव तालुक्यातील शिर्डी,कोपरगाव शहरास अवैध पिण्याचे पाणी शहरात नेण्यासाठीचे उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांचे राजकीय षडयंत्र निळवंडे कालवा कृती समितीच्या माध्यमातून हाणून पाडले.
१५) सन-२०२४ साली दिनांक ०५ जानेवारी रोजी सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील ९० टी.एम.सी.पाणी पूर्वेस मिळविण्यासाठी ऍड.अजित काळे यांच्या महत्वपूर्ण सहाय्यातून जनहित याचिका (क्र.५/२०२४) दाखल,परिणामी राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर विषय आणण्यात यश.
१६) कोपरगाव शहराची पाणी चोरी उघड करून त्यावर सातत्याने लेखन करून जनजागृती करून पाच क्रमांकाचा साठवण तलाव बांधण्यास भाग पाडले.
१७) समाजातील अनिष्ट प्रथांवर कडाडून हल्ला करून अनेक भोंदू बाबा व राजकीय नेत्यांचे वस्त्रहरण करण्यात यश अशा व्यक्ती महत्त्वाचा शेतकरी संघटनेत प्रवेश
उद्या दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निळवंडे कालवा कृती समितीचे व कोपरगाव तालुक्यातील जन कोपरगाव तालुक्याचे भूमिपुत्र नानासाहेब जवरे यांचा शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश.प्रवास वृत्तपत्राचे संपादक नानासाहेब जवरे यांचा शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश होणार आहे. नानासाहेब जवरे यांनी गेल्या 30 वर्षापासून सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकारिता संगमनेर कोपरगाव राहता तालुक्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न निर्भीडपणे मांडणारे जिल्ह्यातील अग्रणी पत्रकार व संपादक म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. नानासाहेब जवरे यांचा होत असलेल्या उद्याच्या शेतकरी संघटनेच्या प्रवेशामुळे शेतकरी चळवळीची जिल्ह्यात मोठी कार्यकर्त्यांची फळी उभी राहणार आहे. नानासाहेब जवरे यांच्याकडून भविष्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा न्याय मिळणार आहे. तरी एका संघर्षशिल व्यक्तिमत्त्वाच्या प्रवेशाला उद्या हनुमान मंदिर जवळके येथे दहा वाजता शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने राहण्याचे आव्हान रूपेंद्र काले, अनिल औताडे, हरिभाऊ तुवर, शिवाजी जवरे, बच्चू मोडवे, युवराज जगताप, प्रभाकर कांबळे, भास्कर तुवर, विलास कदम, नारायण टेकाळे, अशोक काळे, डॉ. दादासाहेब आदिक, अशोक काळे मेजर, नरेंद्र काळे, डॉ.विकास नवले, शरद आसणे, संदीप उघडे, डॉ. रोहित कुलकर्णी, बाबासाहेब नागवडे, आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.