सहकारतील साखर कारखानदारी अडचणीत का पूर्वी ज्या उद्देशाने पूर्वजांनी सहकारी चळवळ उभी केली त्यात त्यांचा प्रामाणिक हेतू.. तालुकाध्यक्ष युवराज जगताप*
सहकार कारखान्यांनी उपपदार्थ काढू नये झालेल्या नफा शेतकऱ्यांना वाटता व ऊसाला योग्य भाव न देता

**सहकारतील साखर कारखानदारी अडचणीत का पूर्वी ज्या उद्देशाने पूर्वजांनी सहकारी चळवळ उभी केली त्यात त्यांचा प्रामाणिक हेतू.. तालुकाध्यक्ष युवराज जगताप*
श्रीरामपूर प्रतिनिधी सहकारातील साखर कारखानदारी काढण्यात प्रामाणिकपणा हेतु होता. चांगल्या उद्देशाने पूर्वजांनी सहकारी साखर कारखाना चळवळ उभी केली त्यात त्यांचा प्रामाणिक हेतू होता. तसेच सभासदांना जनरल मीटिंगमध्ये एखाद्या प्रोजेक्टची मान्यता घेतानी त्यांना टना मागे पैसे कपात करताना हात वर करून मान्यता आपण घेता आणि उपपदार्थ मिळाले तर आपण चांगला भाव देऊ शकतो अशी सभेत सांगता मग नेमकी अडचण येते कोठे? आजही जनरल मीटिंग चे प्रोसेडिग बघितले तर बोलतात एक आणि करतात एक. सहकार कामधेनु मोठ्या विश्वासाने आपल्या ताब्यात दिले.
* परंतु पुढे चालून सहकारी संस्था ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी त्या ठिकाणातून मोडीत काढून तसेच सभासदाची दिशाभूल करू राजकारणाला सुरुवात केली सहकारी संस्था राजकारणाचे अड्डे बनले खाजगी साखर कारखान्यात उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभे करताना खर्च कमी येतो आणि तेच प्रकल्प सहकारी साखर कारखानदारीत उभे करताना खर्च मात्र जास्त येतो याचं कारण प्रकल्प उभे करत असताना प्रकल्पाच्या किमतीच्या 15 ते 20 टक्के रक्कम जास्त दाखवून त्यात भ्रष्टाचार करायचा सभासदांनी मात्र पूर्ण रकमेचे हप्ते व व्याज भरत बसायचं सभासदांची तिच्या भूल करायची आणि सांगायचं हा प्रकल्प उभा झाल्यानंतर टनामागे पन्नास जास्त देता येतील महाराष्ट्र कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या ऊस दराचे विनियमन अधिनियम 2013 व नियम 2016 मधील तरतुदीनुसार हंगाम 2018 19 पासून उत्पन्न विभागणीप्रमाणे कारखान्याचे एकूण साखर उत्पादन मूल्याच्या 75% किंवा उपपदार्थ असतील तर त्याच्या मूल्यांकनाच्या 70 टक्के इतकी रक्कम यापैकी जास्त असणारी रक्कम ऊस दर म्हणून देण्यात यावी परंतु 2018 19 पासून सर्व साखर कारखान्यांचे आर एस एफ एफआरपी पेक्षा कमी दाखवण्यात येत आहेत त्यामुळे काही कारखाने थोडं प्रामाणिकपणा दाखवत आहेत तर काही सहकारी साखर कारखान्याने उपपदार्थाची पैसे शेतकऱ्यांना दिल्याचे आढळून येत नाही कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर त्याला आमदारकीचे डोहाळे लागतात आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी लागणारी कोट्यवधी रुपये महाराष्ट्रातील कारखानदारां कडे येतात कुठून गुजरात मध्ये निवडून गेलेले चेअरमन संचालक कोणतीही आमदारकी खासदारकीची निवडणूक लढवत नाही ते फक्त कारखान्याचे हित बघतात म्हणून त्या ठिकाणी ऊसाला दर महाराष्ट्र पेक्षा जास्त दिला जातो कळावे युवराज जगताप तालुका अध्यक्ष शेतकरी संघटना श्रीरामपूर