पोलीसांनी अटकपूर्व नोटीस व्हॉट्सॅप द्वारे देवू नये – सर्वोच्च न्यायालय*
याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात महत्वाचे निर्देश दिलेले आहेत. जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता आणि नवीन भारतीय नागरीक सुरक्षा संहितेमध्ये काही बाबतीत अटक करण्यापूर्वी संबंधीत व्यक्तिला लेखी नोटीस देण्याची तरतुद आहे.

*पोलीसांनी अटकपूर्व नोटीस व्हॉट्सॅप द्वारे देवू नये – सर्वोच्च न्यायालय*
“`नेवासा प्रतिनिधी स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकारावर गदा आणणारी असल्याने अटक ही एक गंभीर बाब आहे आणि म्हणुनच अटक करताना कायद्याच्या चौकटित काम करणे, अनावश्यक अटक न करणे आवश्यक ठरते. अर्थात आपल्या व्यवस्थेत दरवेळेला असे होईलच याची काही शाश्वती नाही. म्हणुनच काहीवेळेस उच्च न्यायालयेन किंवा सर्वोच्च न्यायालय या विषयात लक्ष घालुन विविध निर्देश देत असते.
याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात महत्वाचे निर्देश दिलेले आहेत. जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता आणि नवीन भारतीय नागरीक सुरक्षा संहितेमध्ये काही बाबतीत अटक करण्यापूर्वी संबंधीत व्यक्तिला लेखी नोटीस देण्याची तरतुद आहे.
मात्र अशा नोटिसा व्हॉट्सॅप आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे देता येतील का ? ते विधीग्राह्य आहे का हा महत्वाचा प्रश्न उदभवला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्देश दिलेले आहेत.
१. सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी आपापल्या पोलीस दलाला आदेशाव्दारे फौजदारी प्रक्रिया संहिता आणि नवीन भारतीय नागरीक सुरक्षा संहिते अंतर्गत अटकपूर्व नोटिस देताना ती व्हॉटसॅप किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दिली जावू नये आणि अशाप्रकारे दिलेली नोटीस कायदेशीर पूर्तता करणारी ग्राह्य धरली जाणार नाही हे स्पष्ट करावे
२. सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांनी आपापल्या पोलीस दलाला आदेशाव्दारे अशाप्रकारे कोणत्याही नोटीस देताना कायदेशीर तरतुदीनुसार नोटीस द्यावी व्हॉट्सॅप किंवा इतर मार्गाने दिलेली नोटिस ग्राह्य धरली जाणार नाही हे स्पष्ट करावे.
३. सर्व उच्च न्यायालयांचे निबंधक आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांचे मुख्य सचिव यांना या निर्देशांचे पालन केल्याचे सत्यप्रतिज्ञापत्र ४ आठवड्यांत सादर करावे
स्वातंत्र्य या मूलभूत अधिकारावर गदा आणणारी अटक करताना कायद्याचे पालन होण्याकरता हे निर्देश अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. सर्वसामान्य नागरीक आणि पोलीसांना सुद्धा याची माहिती होणे हे महत्वाचे आहे.“`
*✌️गावकऱ्यांनो जागरूक व्हा!💯*
*✍️लोकसेवकावर बारकाईने नजर🎯*
✍️ *माहिती अधिकाराचा वापर करा. देशाची सेवा करा.* ✌️💯
*(माहिती अधिकार कायद्याचे प्रचार-प्रसारक माहिती अधिकार कायद्याचा वापर करा देशाची सेवा करा)*
*Power Of RTI 2005*🇮🇳
*!! कायदे शिका कायद्याने लढा.!!*
🎙️🇮🇳 *PUBLIC DEMAND* 🇮🇳🎙️
*🎙️ जागे व्हा ! निर्भय व्हा !!*
*निर्भय व्हा ! जागृत व्हा !! सक्रिय व्हा !!!*
*✌️”जनताच मालक”💯✌️*
“`✒️Dipak Pachpute ✒️ Ahilya-nagar“`
*बातमी इतकी शेअर(Share) करा*
**जनहितार्थ प्रसारित**