जिल्हा सहकारी बँक सरळ भरती* *करण्याची उमेदवारांची मागणी*
अहमदनगर जिल्हा सहकारी. बँकेमध्ये सुमारे ७०० पदासाठी भरती होत आहे.

*जिल्हा सहकारी बँक सरळ भरती* *करण्याची उमेदवारांची मागणी*
नेवासा ( प्रतिनिधी)अहमदनगर जिल्हा सहकारी. बँकेमध्ये सुमारे ७०० पदासाठी भरती होत आहे. परीक्षार्थी घरचे मंडळी आपल्या उमेदवाराचे जिल्हा बँकेत वर्णी लागण्यासाठी पडद्यामागून फीडिंग लावून सोगट्या फिरवण्यासाठी सज्ज झाली आहे. परीक्षार्थींची पालक काही वशिला लागतो की काय अशा पद्धतीने नियोजन करत आहेत. त्यासाठी नातलग लोकांची वर्णी कशी लागेल याच्यावर भर दिला जात आहे. या भरतीमध्ये सरळ पद्धतीने भरती होण्यासाठी परीक्षार्थींची इच्छा त्यांनी व्यक्त केली असून त्याच्यात वशिलेबाजी होता कामा नये
याची दक्षता घेण्यात यावी.
त्या भरती परीक्षेची ऑफलाईन परीक्षा घेण्याचे ऐवजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी त्यासाठी सहा कंपन्यांची संचालक यावर एक कमिटी केली पाहिजे त्या काही ऑफलाइन परीक्षा घेण्यापेक्षा हे ऑनलाईन परीक्षा घेतली गेली पाहिजे. ऑफलाइन मध्ये खूप मोठा घोटाळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच जिल्हा बँकेत भरती करतानी अनुभवाचा दाखला हा बोगस पद्धतीने मिळून या कमिटीकडे वशिलेबाजी करून आपली वर्णी कशी लागेल यावर संशय व्यक्त केला जात असल्याची चर्चा परीक्षार्थी बोलले जात आहे तरी ही भरती पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विशेष परिश्रम जिल्हा सहकारी बँक व सहकार खाते निश्चित अवलंबियात यावी हे मागणी परीक्षार्थी आहे.