बी हेव्ही मोलासिस (शुगरकेन ज्यूस) दरात वाढीला मंजुरीची शक्यता; ऊस उत्पादकांना लाभाची आशा
केंद्र सरकारकडून आज बी हेव्ही मोलासिस (शुगरकेन ज्यूस) दरात 1.31 रुपये प्रति लिटर वाढ करण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.

बी हेव्ही मोलासिस (शुगरकेन ज्यूस) दरात वाढीला मंजुरीची शक्यता; ऊस उत्पादकांना लाभाची आशा
नवी दिल्ली /नेवासा प्रतिनिधी– केंद्र सरकारकडून आज बी हेव्ही मोलासिस (शुगरकेन ज्यूस) दरात 1.31 रुपये प्रति लिटर वाढ करण्यास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.
साखर उद्योगावर पुन्हा मेहेरबानी
यापूर्वी केंद्र सरकारने 10 लाख टन साखर निर्यातीस मंजुरी देत साखर कारखान्यांना मोठा दिलासा दिला होता. आता इथेनॉलसाठी वापरण्यात येणाऱ्या बी हेव्ही मोलासिसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय होत असल्याने साखर कारखान्यांना आणखी फायदा होणार आहे.
इथेनॉल उत्पादनासाठी सकारात्मक पाऊल
सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉल उत्पादनास चालना मिळेल आणि जैवइंधन क्षेत्र अधिक सक्षम होईल. इथेनॉलच्या दरवाढीमुळे साखर कारखान्यांचा नफा वाढेल आणि ऊस उत्पादकांना ऊस बिलाचा त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
ऊस उत्पादकांसाठी FRP वाढीची शक्यता
साखर उद्योगास मिळत असलेल्या या सकारात्मक निर्णयांमुळे ऊस उत्पादकांनाही ऊसाच्या एफआरपी (किमान हमी दर) वाढीची आशा आहे. साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यास शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाढीव दराने पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारच्या या निर्णयावर साखर उद्योग, इथेनॉल उत्पादक आणि शेतकरी वर्गाची नजर असून, अधिकृत घोषणेनंतरच याचा प्रत्यक्ष परिणा
म स्पष्ट होईल.