टेनिसपटू प्रणव कोरडे याची दक्षिण भारत आंतरविद्यापीठ टेनिस (पुरुष) स्पर्धातून ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड*
केरळ विद्यापीठाद्वारे आयोजित दक्षिण विभागीय आंतरविद्यापीठ टेनिस (पुरुष) स्पर्धा २०२४-२५ ही 22ते 26 नोव्हेंबर 2024 केरळ टेनिस अकादमी, कुमारपुरम त्रिवेंद्रम टेनिस क्लब, कौडियार येथे आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये साउथ झोन विभागातून एकूण 59 विद्यापीठाने सहभाग नोंदवला आणि या 59 मधून सेमी फायनलला आलेले चार संघ विद्यापीठाचे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी जयपूर येथे 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

*टेनिसपटू प्रणव कोरडे याची दक्षिण भारत आंतरविद्यापीठ टेनिस (पुरुष) स्पर्धातून ऑल इंडिया स्पर्धेसाठी निवड*
संभाजीनगर ( प्रतिनिधी) केरळ विद्यापीठाद्वारे आयोजित दक्षिण विभागीय आंतरविद्यापीठ टेनिस (पुरुष) स्पर्धा २०२४-२५ ही 22ते 26 नोव्हेंबर 2024 केरळ टेनिस अकादमी, कुमारपुरम त्रिवेंद्रम टेनिस क्लब, कौडियार येथे आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये साउथ झोन विभागातून एकूण 59 विद्यापीठाने सहभाग नोंदवला आणि या 59 मधून सेमी फायनलला आलेले चार संघ विद्यापीठाचे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी जयपूर येथे 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये दक्षिण भारत विभागातून छत्रपती संभाजी नगरचा प्रणव कोरडे हा कोनेरू लक्ष्मय्या एज्युकेशन फाउंडेशन विद्यापीठचे प्रतिनिधित्व करीत असताना त्याने अतिशय उच्च दर्जाची खेळी करून आपल्या संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचवले. तसेच संघाला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम 2024- 25 साठी पात्र ठरवले. त्यांचा सामना जयपूर येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये होणार आहे, त्यासाठी तो लगेच जयपूरकडे रवाना झाला आहे. त्यांनी कॉटर फायनल मध्ये केरळ युनिव्हर्सिटीचा पराभव करून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला सेमी फायनल मध्ये त्यांचा सामना एस आर एम आय एस टी युनिव्हर्सिटी चेन्नई यांच्याबरोबर झाला. या स्पर्धेमध्ये त्यांचा 3-2 असा पराभव झाला, त्यानंतर त्यांचा सामना तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी उस्मानिया विद्यापीठ/ युनिव्हर्सिटी तेलंगाना यांच्याबरोबर झाला. त्यात ते विजयी ठरले असून त्यांनी दक्षिण भारत विभागातून आपले स्थान पक्के केले आहे. सर्व स्पर्धेमध्ये प्रणव कोरडे यांनी अतिशय दर्जेदार खेळी करून स्पर्धेमध्ये आपला प्रभाव पडला आहे तरी त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, आणि विशेष म्हणजे एका दिवसात सलग साडेपाच तास तीन सामने खेळून स्वतःचा स्टॅमीना सिद्ध केला आहे.
तो एक होतकरू व्यावसायिक टेनिसपटू आहे. तसेच तो आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी देखील करत आहे व त्याला सामाजिक स्तरातून भरघोस पाठींबा मिळत असून मुंबई येथील सुप्रसिद्ध उद्योजक श्री हिराभाई दोषी यांनी प्रणवचे विशेष कौतुक केले आहे.
प्रणव कोरडे हा एक प्रतिभावान खेळाडू आहे याला प्रशिक्षक गजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सध्या प्रणव कोरडे हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या हेतूने बंगलोर येथील पीबीआय टेनिस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे.
या कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. श्रीकांतजी अदवंत, ॲड. अजयजी तल्हार डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, अहिल्यानगरचे संघ कार्यवाहक श्री शिव शंकरजी शिंदे, श्री शंकरशेठ नळकांडे नेवासा यांनी प्रणव ज्ञानेश्वर कोरडे याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.