शेतकऱ्यांची संघटित फसवणूक केले प्रकरणी फडणवीस, पवार शिंदेंसह कोकाटेवर पोलिसात गुन्हा दाखल –एड. अजित काळे राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना.
श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक यांना आरोपी विरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता 2013 मधील कलम 171, 316 (2), 318 (4) व 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यासंबंधी योग्य तो आदेश पारित करून अर्जदार याची तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे असे नमूद करण्यात आले.

शेतकऱ्यांची संघटित फसवणूक केले प्रकरणी फडणवीस, पवार शिंदेंसह कोकाटेवर पोलिसात गुन्हा दाखल –एड. अजित काळे राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना.
शिरजगाव प्रतिनिधी:-
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती देणे बाबतचें आश्वासन विधानसभा निवडणूकीत भाजपाचे देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी एकत्रितरित्या राज्यातील शेतकऱ्यांना दिले होते. सदर दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून राज्यातील शेतकऱ्यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महायुतीच्या विधानसभा उमेदवारांना मते देऊन सरकार अस्तित्वात आणले. परंतु सरकार अस्तित्वात आणल्यानंतर व पदभार स्वीकारल्यानंतर सोयीस्कररित्या कर्जमुक्ती या विषयाला बगल देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने संघटित फसवणूक असून याबाबत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अंजली तीन महिन्यापासून जनआंदोलने छेडली गेली. लोकशाहीत जन आंदोलन हे मोठे हत्यार असून सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज भाऊसाहेब जगताप यांनी 18 5 2025 रोजी श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये प्रत्यक्ष पोलीस निरीक्षक यांना आरोपी विरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता 2013 मधील कलम 171, 316 (2), 318 (4) व 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यासंबंधी योग्य तो आदेश पारित करून अर्जदार याची तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे असे नमूद करण्यात आले. अर्जदार युवराज जगताप यांनी आपला संपूर्ण शंभर टक्के कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मी पिकवलेल्या शेतमालाला गेल्या पंधरा वर्षापासून राज्य व केंद्र सरकारने उत्पादन खर्च भरून निघेल इतका भाव मिळवून दिला नाही अथवा मी करत असलेल्या व्यवसायाला कुठलीही संरक्षण न देता माझ्या व्यवसायाच्या विरोधी धोरणे घेतली असल्याने मी कर्ज भरूच शकत नाही. माझी कर्ज भरण्याची इच्छा असूनही सातत्याने शेती उत्पादन तोट्यात विकत असल्याने माझी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. युवराज जगताप यांनी गृहमंत्रालयाच्या ई प्रणालीवर आरोपी १)देवेंद्र गंगाधरराव फडणवीस — नागपूर, आरोपी २) एकनाथ संभाजी शिंदे -ठाणे व आरोपी ३) अजित अनंतराव पवार – बारामती व आरोपी ४) माणिक शिवाजी कोकाटे सिन्नर अशी संयुक्तरीत्या संघटित शेतकऱ्यांची फसवणूक केले प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
तसेच अहिल्ल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेने श्रीरामपूर ग्रामिन पोलीस स्टेशन मध्ये शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अजित काळे उच्च न्यायालय औरंगाबाद राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष जाऊन पोलिस निरीक्षक श्रीरामपूर ग्रामीण यांना प्रत्यक्ष फिर्यादीची प्रत फिर्याद नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज आय.पी.एस रॉबिन बंसल प्रशिक्षणार्थी यांच्या हातात दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, स्वतः फिर्यादी युवराज भाऊसाहेब जगताप, साहेबराव चोरमल, एडवोकेट सर्जेराव घोडे, नरेंद्र काळे, संतोष पठारे, सुजित बोडखे, बाळासाहेब असणे, सुनील असणे, एडवोकेट प्रशांत कापसे, जिल्हा कृती समितीचे राजेंद्र लांडगे, बाबासाहेब वेताळ, सचिन वेताळ, बापूसाहेब गोरे, अभिषेक वेताळ राहुल कापसे, महेश आघाडे, दीपक धिरडे , बबनराव नाईकआदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एडवोकेट काळे म्हणाले की, मी उच्च न्यायालय औरंगाबाद मध्ये ३२ वर्षे वकिली म्हणून काम केले. याबाबत मी गेली पंधरा दिवस कायद्याचा बारकाईने भारतीय दंड संहिता कायद्याचा अभ्यास करून राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक हित रक्षणार्थ फिर्याद केली आहे. अशा फिर्यादी राज्यातील लाखो थकीत कर्ज असलेले शेतकरी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार असून याबाबत पोलीस प्रशासनाने भूमिका न घेतल्यास आपण उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सदर फिर्यादी संबंधितांवर दाखल करणे कामी न्यायालयात दाद मागणार आहोत. ज्या कर्जथकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांनी न्यायालयात दावे दाखल केली आहे अशा न्यायप्रविष्ठ कर्ज खातेदारांनी विहित नमुन्यातील फिर्यादी वचननामा दिलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींच्या नावे दाखल कराव्यात असे आव्हानही एडवोकेट काळे यांनी केले
दिनांक 18 4 2025 रोजी सकाळी नऊ वाजता टाकळीभान येथे शेतकरी संघटनेच्या कार्यालयाचे व शाखेचे उद्घाटन झाले यावेळी एडवोकेट काळे बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांना जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती सरकार करत नाही तोपर्यंत आपण जनआंदोलनातून रस्त्यावरील लढाई व न्यायालयीन लढाई लढणार असल्याचाही इशारा काळे यांनी दिला. टाकळीभान येथील शाखा स्थापनेच्या कार्यक्रम प्रसंगी शेकडो शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन संघटनेत प्रवेश केला यामध्ये पंकज पटारे, गोरख बनकर, अरुण मुठे, निखिल पटारे, बाळासाहेब शेळके, अनिल य . कोकने सुनील आ. कोकने विलास बोडखे, रमेश राऊत, किशोर पंडित, श्याम गजभिव, भाऊराव गव्हाणे, किरण तोरणे, रवींद्र ओहोळ अमृत बोडखे, आदींनी आपल्या छातीला संघटनेचा बॅच लावून प्रवेश केला व यापुढे शेतकरी चळवळीत काम करण्याचाही निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष विठ्ठल पवार हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पटारे, सुजित बोडखे, डॉक्टर विकास नवले, डॉक्टर दादासाहेब आदिक, राहुल कापसे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी हरिभाऊ तुवर, सुदामराव औताडे, बंडू पाटील पठारे, जयकर मगर, दिलीप कोकने, कार्लस साठे, सोपान नाईक, इंद्रभान चोरमल, बापूसाहेब शिंदे, केरू बापू मगर, दिगंबर मगर, सतीश नाईक, शैलेश वमने, शिवाजी ताके, देवा कोकने आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जोपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्याच्या सातबारावर असलेल्या पतसंस्था, फायनान्स कंपन्या, व्यापारी सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका जिल्हा बँका आदि असलेल्या कर्जातून मुक्तता करत नाही तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये असे आव्हान जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले. कुठल्याही वित्तीय संस्थेकडून शेतकऱ्यांना त्रास दिला गेल्यास संबंधित शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क करावा.. शेतकरी संघटना आपल्या पाठीशी राहील. शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी संबंधित आरोपीच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्याचे धाडस दाखविले त्यांचे राज्यातील शेतकऱ्यांच्या व शेतकरी संघटनेच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात आले, अशा प्रकारच्या फिर्यादी दाखल करण्याचे धाडस प्रत्येक शेतकऱ्यांनी दाखवावे असे आवाहनही करण्यात आले.
अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना अहिल्यानगर.