नेवासा येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा कार्यक्रम
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.श्री. विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील, विधानसभा मतदारसंघ २२५ नेवासा यांचे शुभहस्ते ध्वजारोहण होईल. या प्रसंगी विविध शासकीय व स्थानिक अधिकारी, मान्यवर नागरिक, विद्यार्थी, व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे

नेवासा येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा कार्यक्रम
नेवासा | १ मे २०२५ — महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त नेवासा येथे एक भव्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. १ मे २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता पोलीस परेड ग्राउंड, नेवासा येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.श्री. विठ्ठलराव वकिलराव लंघे पाटील, विधानसभा मतदारसंघ २२५ नेवासा यांचे शुभहस्ते ध्वजारोहण होईल. या प्रसंगी विविध शासकीय व स्थानिक अधिकारी, मान्यवर नागरिक, विद्यार्थी, व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी दिली असून नागरिकांनी या शासकीय समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
टीप: सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सकाळी ८:०० ते ९:३० या वेळेत ध्वजारोहण किंवा इतर शासकीय समारंभांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. कोणतेही अर्धशासकीय समारंभ या दरम्यान घेऊ नयेत, असा स्पष्ट आदेशही देण्यात आला आहे.