अत्याचार प्रकरणातील कोर्टात तिन्ही आरोपींना जामीन
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मंजूर श्रीरामपूर येथील एका अल्पवयीन मुलीने आरोपी ललित अशोक गवारे अनिकेत बाळासाहेब औताडे व महेश अभय तेलतुंबडे यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर६०७/२०२४ हा दाखल केला होता व त्याच्या अनुषंगाने अर्जदार आरोपी विरुद्ध भादवि कलम ३७६ ३७६डी ३५४,३२३,५०४,५०६,५०९ तसेच पास्को ॲक्ट ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता
खबरनामा न्यूज :-श्रीरामपूर येथील बहुचर्चित गॅंग रेप प्रकरणामधील आरोपीस अंतरीम जामीन माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मंजूर श्रीरामपूर येथील एका अल्पवयीन मुलीने आरोपी ललित अशोक गवारे अनिकेत बाळासाहेब औताडे व महेश अभय तेलतुंबडे यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर६०७/२०२४ हा दाखल केला होता व त्याच्या अनुषंगाने अर्जदार आरोपी विरुद्ध भादवि कलम ३७६ ३७६डी ३५४,३२३,५०४,५०६,५०९ तसेच पास्को ॲक्ट ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर फिर्यादीमध्ये फिर्यादीचे सदर अर्जदार आरोपी विरोधात दिनांक १२/४/२०२४ रोजी शिर्डी येथील साई मलिक हॉटेल व दिनांक २०/४/२०२४ रोजी श्रीरामपूर येथील पिझ्झा हट कॅफे मध्ये सर्व आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केल्याचे आरोप केलेले होते सदर गुन्ह्या दाखल झाल्यानंतर अर्जदार आरोपी यांनी श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता तथापि फिर्यादी ही अल्पवयीन असल्याने तसेच सदरचा गुन्हा पोस्को कायद्याच्या अंतर्गत असल्याने माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने अर्जदार आरोपीचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते त्यावर पुन्हा अर्जदार आरोपींनी माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन
मिळण्यासाठी तीन स्वतंत्र अर्ज अॅड अजितदादा बी काळे व ॲड साक्षी अजित काळे यांचे मार्फत दाखल केले होते दिनांक १६/१०/२०२४ रोजी सदर प्रकरणाची नुकतीच सुनावणी झाली असून अर्जदार आरोपीतर्फे अॅड अजित बी काळे अॅड साक्षी काळे यांनी जोरदार युक्तिवाद केला व न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की दिनांक १२/४/२०२४ रोजी अर्जदार आरोपी पैकी अर्जदार आरोपी महेश तेलतुंबडे हा फार्मसी च्या परीक्षेसाठी उपस्थित होता त्यामुळे दिनांक १२/४/२०२४ ची घटना ही खोटी आहे तसेच फिर्यादी व आरोपीचे मोबाईल लोकेशन मेहरबान कोर्टासमोर मांडण्यात आले त्यामध्ये १२/४/२०२४ रोजी फिर्यादी व आरोपी हे सदर दिवशी शिर्डी अथवा श्रीरामपूर येथे नसल्याचे टाॅवर लोकेशन वरून दिसून येत नसल्याचे मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले तसेच पिझ्झा हट कॅफे हे श्रीरामपुरातील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असल्याने सदर ठिकाणी फिर्यादी नमूद प्रमाणे आरोपी गुन्हा करू शकत नाही असे देखील सांगण्यात आले तसेच माननीय सर्वोच्चन्यायालयाचे अनेक न्याय निवाडे मेहरबान कोर्टासमोर मांडण्यात आले व अॅड अजित बी काळे व अॅड साक्षी काळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून वर नमूद तीनही आरोपींना माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अटी व शर्तीसह मंजूर केलेला आहे तसेच पुढील सुनावणी दिनांक ११/११/२०२४ रोजी ठेवण्यात आली आहे .