अखेर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतनिधी वाटप; विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिका-यांना निर्देश , डॉ.ढवळेंच्या तक्रारीची दखल
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांस मदत म्हणून १ लाख रुपये मदत दिली जाते.त्यातील ७०,००० रूपयांची बँकेत एफडी केली जाते तर उर्वरित ३०,००० रूपये कुटुंबियांच्या कामी येतात.त्यातही शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून १ लाख रुपयांची मिळणारी मदत उशिराने दिली जात असेल तर मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा एक प्रकारे छळच म्हणावा लागेल

अखेर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतनिधी वाटप; विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिका-यांना निर्देश , डॉ.ढवळेंच्या तक्रारीची दखल
बीड:- ( दि.०८ ) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांस मदत म्हणून १ लाख रुपये मदत दिली जाते.त्यातील ७०,००० रूपयांची बँकेत एफडी केली जाते तर उर्वरित ३०,००० रूपये कुटुंबियांच्या कामी येतात.त्यातही शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून १ लाख रुपयांची मिळणारी मदत उशिराने दिली जात असेल तर मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा एक प्रकारे छळच म्हणावा लागेल.बीड जिल्ह्यातील मागील वर्षी १ जानेवारी २०२४ ते १ नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यात १७४ शेतकऱ्यांनी आत्महत्यांची प्रकरणे शासन दरबारी नोंद असून मात्र मदत केवळ ६५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदतनिधी मिळावा तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १५ दिवसात मदत मिळणे बंधनकारक असताना मदत मिळण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना प्रकरणात प्रशासकीय कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे
निवेदन विभागीय आयुक्तांना दिल्यानंतर याची दखल घेत नयना बोंदार्डे अपर आयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर
यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दि. २०.१२.२०२४ रोजी तातडीने संबंधित प्रकरणी निवेदनात नमूद केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा व अर्जदार यांना आंदोलनापासून परावृत्त करून प्रकरणात कायदा सविस्तर प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे म्हटले आहे.
विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतर जिल्हाधिका-यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढत निधीचे वाटप
—
नयना बोंदार्डे ,अपर आयुक्त ( महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी दि.३०.१२.२०२४ रोजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी बीड यांना निर्देश दिल्यानंतर दि.६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतनिधी अनुषंगाने बैठक घेऊन एकुण १२ महिन्यांतील २०५ आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकरणात १४९प्रकरणे पात्र,१९ प्रकरणे अपात्र व ३७
प्रकरणे प्रलंबित असुन ८३ लाख ५० हजार रुपयांची मदतनिधी वितरीत करण्यात आला आहे.
डॉ .गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२