शेतकऱ्यांनी नव्हे.! मंत्री अजित पवार आणि अधिकार्यांनी शेतकऱ्यांना लाखो कोटीचा चुना लावला, शेजोविमंशेसंचा आरोप ..!,,*
मध्यंतरी कृषिमंत्री कोकाटे यांनी भिकाऱ्यासारखा एक रुपयाचा विमा अशी भाषा वापरली, मध्यंतरी भाजपा सन्मिस्र माजी मंत्र्यी तानाजी सावंत यांनी भिकारी शेतकरी, तर सोमवारी पुण्यामध्ये अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला असे गंभीर वक्तव्य केलेले आहे, उपमुख्यमंत्री यांच्या विधानाचा संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला

“शेतकऱ्यांनी नव्हे.! मंत्री अजित पवार आणि अधिकार्यांनी शेतकऱ्यांना लाखो कोटीचा चुना लावला, शेजोविमंशेसंचा आरोप ..!,,*
*पुणे २० एप्रिल २०२५.*
पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकारमधील अनेक आमदार खासदार मंत्री आणि वाचाळविरा सारख्यांनी सतत शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करतात खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याच सरकारला चुना लावला नाही, लावला असता तर असे वाचाळवीर मंत्री मंत्रिमंडळात दिसलेच नसते आता संताप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर केला आहे.* संघटनेने म्हटले आहे की 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा कोणी केला, बीड जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयांचा पिक विमा घोटाळा कोणी केला, बिड, पुणे, नाशिक, वर्धा, नागपूर , कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये हजारो कोटीचा घोटाळा कोणी केला, नुकताच एका जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसानीमध्ये झालेल्या 50 कोटी रुपयांच्या नुकसान तलाठी तहसीलदार कृषी सहाय्यक यांनी आर्थिक घोटाळा केला, तसेच मागील पाच सहा वर्षातील ऊस गळीत हंगामात सहकारी आणि खाजगी साखर कारखाने यांनी 22 ते 25 हजार कोटी रुपये एफ आर पी चा घोटाळा कोणी केला, 85 सहकारी साखर कारखाने मोडी काढून खाजगीकरण करत हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार कोणी केला, आणि सरकारला कोणत्या मंत्र्यांनी किती हजार कोटीचा चुना लावला, त्याला मोदी सरकारने कशी क्लीन चीट दिली याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावं आणि मग शेतकऱ्यांच्या विषयी टिंगल टवाळी करावी किंवा गावरान भाषा वापरावी.! संघटनेला देखील वाचाळ वीर मंत्री अजित पवार यांच्या विषयी गावरान भाषा वापरता येते असा गर्भित इशारा संघटनेने दिला आहे.
मध्यंतरी कृषिमंत्री कोकाटे यांनी भिकाऱ्यासारखा एक रुपयाचा विमा अशी भाषा वापरली, मध्यंतरी भाजपा सन्मिस्र माजी मंत्र्यी तानाजी सावंत यांनी भिकारी शेतकरी, तर सोमवारी पुण्यामध्ये अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी सरकारला चुना लावला असे गंभीर वक्तव्य केलेले आहे, उपमुख्यमंत्री यांच्या विधानाचा संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला आहे. तसेच सरकार मधे असले वाचाळवीर जाणीवपूर्वक आहेत ही बाब शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, आणि येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा वाचाळ विरांच्या सरकारला चुनाच लावला पाहिजे., असले वाचाळवीर सरकार मध्ये आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या अत्यंत अर्थिक नुकसान आणि आत्महत्या होत आहेत, शेतकऱ्यांवर सतत चुकीच्या पद्धतीने आरोप केले जातात खऱ्या अर्थाने राज्य सरकार मधले अधिकारी मंत्री आमदार खासदार यांनी शेतकऱ्यांच्या नावाने अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे नुकताच एक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाई अधिकारी तलाठी यांनी वाटून घेतली त्यामध्ये कृषी विभागाचा मोठा सहभाग आहे याविषयी अजित पवारांची वाचा का उघडत नाही असा देखील संतप्त प्रश्न विठ्ठल राजे पवार यांनी उपस्थित केला आहे.
*मंत्री अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांकडून मोदी -भाजपा फडणवीस सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.*
राज्य आणि राष्ट्रातील शेतकऱ्यांनी भाजपा सरकारला 2014 पासून सातत्याने मदत केली म्हणून भाजपा सरकार केंद्र आणि राज्यामध्ये सातत्याने कार्यरत आहे हे या वाचाळ विरांनी विसरू नये.! केवळ सत्तेसाठी संधी साधू चिंधी चोर, 70 हजार कोटीचे सिंचन घोटाळे करणारे प्रचंड भ्रष्टाचारी लोक सत्तेत घुसल्यामुळे राज्य आणि राष्ट्राच्या अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे, अनेक शेतकऱ्यांनी संतप्त होऊन शेती करणं बंद केलेला आहे जवळपास भारतामध्ये पाच लाख हुन अधिक शेतकऱ्यांनी शेती सोडलेले आहे याचा दाखला केंद्र आणि राज्य सरकारला अनेक वेळा दिलेला आहे.
*”ए आय तंत्रज्ञान धुळफेक., सरकारी आर्थिक संपत्ती लुटण्यासाठी डाव आहे..,,*
राज्यात नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य अर्थात ए आय तंत्रज्ञानाच्या गोंडस नावाखाली सरकारी संपत्ती लुटण्याचा आणि त्यामधून प्रचार प्रसार माध्यमांच्या मार्फत अजित पवार राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या जाहिरातीच्या नावाखाली सरकारला चुना लावण्याचा डाव आहे. ए आय सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अजित पवार राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या जाहिराती आणि सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला जात आहे, आम्ही संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे प्रधानमंत्री यांना महाराष्ट्र राज्यामध्ये यासारखे तंत्रज्ञान हवे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार खासदार मंत्री पक्ष संघटना यांचे पोट भरण्यासाठी नाही.! म्हणून एआय तंत्रज्ञानासारखे गोंडस नाव देऊन राज्याच्या तिजोरीतून खंडणी वसूल केली जात आहे या सरकारी दोरी लुटीच्या संदर्भात माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालय यांना सविस्तर अहवाल देऊन सदरची फाजील योजना बंद करून वाचाळविराचे अशा माध्यमातून सरकारला चुना लावण्याचे लाड पुरवू नयेत अशी मागणी करणार आहोत असे विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.*
शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक जनहित याचिका दाखल करून राज्यातील तमाम शेतकऱ्यांना आणि सरकारला देखील मोठी मदत केली आहे त्या बदल्यात सरकारने शेतकऱ्यांना तितकीशी मदत केलेली नाही असा आरोप देखील संघटनेने केला आहे, विठ्ठल राजे पवार म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांची वीजबिल मुक्ती ही शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने न्यायिक मार्गाने मुंबई उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाकडे याचिका दाखल करत मिळवलेली आहे, तसे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबारच्या सभेत जाहीर कबूल केले आहे. पण राज्य सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्री नेत्यांकडून ए आय चे नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावाने होत असलेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार रोखला पाहिजे,
शेतकऱ्यांच्या नावाने होत असलेली लूट आणि त्यामुळे शेती उत्पन्नाचे होत असलेले नुकसानीमुळे राज्य आणि केंद्र सरकार हे अन्य धान्य पुरवण्याच्या संदर्भात धोक्यात येऊ शकते, सरकारने असे वाचाळवीर आवरावेत, तसेच भारताचे पंतप्रधान यांनी 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भ्रष्टाचारी करेप्टेड पार्टी असे म्हटलेले आहे त्यात कोणती चूक नाही. शेतकऱ्यांच्या नावाने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मोठमोठ्या चोऱ्या केले आहेत हे सर्व ऋत आणि ज्ञात आहे याची जाणीव मंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी करून द्यावी, किंबहुना अशा वाचाळ वीर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून देखील टाकावे अशी मागणी देखील संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केली आहे.