शेतकरी संघटनेमुळे *नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड*
नेवासा तालुक्यातील आठही मंडळे शेतकरी संघटनेच्या अथक प्रयत्नातून पिक विम्यास पात्र ठरल्याने आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात पैसे जमा होणार आहेत . 2023/24 खरिप पंतप्रधान पिक विमा
शेतकरी संघटनेमुळे
*नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड*
=======================
नेवासा – नेवासा तालुक्यातील आठही मंडळे शेतकरी संघटनेच्या अथक प्रयत्नातून पिक विम्यास पात्र ठरल्याने आज रात्रीपासून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात पैसे जमा होणार आहेत . 2023/24 खरिप पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत नेवासे तालुक्यतील नेवासा बु , चांदा , कुकाणा , सोनई इ 4 मंडळे 25 टक्के अग्रीम विम्यातून वगळलेली होती .
परंतु शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड अजितदादा काळे यांनी दप्तर दिरंगाई मुळे वंचित असल्याचे सत्य बाहेर आणले व सर्व पदाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्यास सांगितले . त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी नेवासा तहसिल ,कृषि विभाग व ओरिन्टल इन्शुरन्स कंपनी कडे सातत्याने पाठपुरावा केला . जिल्हाधिकरी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
तसेच त्यानंतरही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या त्यांचीच विमा रक्कम मिळणार असा सुर निघू लागला होता . परंतु शेतकरी संघटनेने शेतकरी ॲन्ड्राइड साक्षर नाही , मोबाईलला रेंज नाही व शेतावर 24 तास लाईट नसल्या कारणाने सर्व शेतकरी ऑनलाइन तक्रारी देऊ शकत नाही व त्यामुळे लाभापासून वंचित राहतात ही बाब प्रशासनासमोर निदर्शनास आणून दिली .त्यामुळे 12 ऑगस्ट 2023 ते 6 सप्टेंबर 2023 हा कालखंड अवर्षण काल आहे व तो 21 दिवसांपेक्षा जास्त आहे हे शासनाच्या लक्षात आणून दिले .आणि पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत असलेल्या नियमावलीत 21 दिवसापेक्षा जास्त कालखंड अवर्षण असल्याने नेवासे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शासकीय उंबरठ उत्पन्न ग्राह्य धरून सरसकट विमा रक्कम द्यावी यासाठी शेतकरी संघटना आग्रही राहिलेली होती .या नियमावलीत खरीप 2023 च्या सर्व पिकांचा समावेश या योजनेत झाल्या कारणाने आज सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकलेला आहे .त्यासाठी शेतकरी संघटनेने उपोषणाचे देखील हत्यार उपसलेले होते त्यानंतर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेने ढोल बजाव हे आंदोलन देखील केले आणि विमा रक्कम मिळण्यास होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र टेबल लावण्याची तहसील कार्यालयाला सूचना केली ..या सर्वांची परिणिती म्हणून आज सर्व शेतकऱ्यांची दसरा दिवाळी गोड होणार आहे .
चौकट
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजितदादा काळे यांनी सांगितले की सदर रक्कम उशिरा प्राप्त झालेली असून त्यावर मिळणारे व्याज व कोणाचीही रक्कम टक्केवारी नुकसानीपेक्षा कमी आल्यास शेतकरी संघटना त्याचा पाठपुरावा करून कंपनीकडून वसूल करणार आहे
सदर पिक विमा मिळावा म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिलराव अवताडे ,जिल्हा उपाध्यक्ष हरी अप्पा तुवर , युवाध्यक्ष डॉ रोहीत कुलकर्णी , बाबासाहेब नागोडे, विश्वासराव मते , नरेंद्र पा . काळे , किरणदादा लंघे , भास्करराव तुवर , अजित तुवर , कैलास पवार , अॅड बाळसाहेब कावळे , सोमनाथ औटी या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतल्याने आज सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकलेला आहे , त्यामुळे या सर्व टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .