शेतकरी संघटनेची स्थापना बाभुळखेडा येथे संपन्न*
अजित काळे, प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन; शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजूट होण्याचे आवाहन*

*शेतकरी संघटनेची स्थापना बाभुळखेडा येथे संपन्न*
*अजित काळे, प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन; शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजूट होण्याचे आवाहन*
*नेवासा,बाभुळखेडा* – शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी बाभुळखेडा येथे नव्या शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली. या सोहळ्याचे उद्घाटन अजित काळे, प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
संघटनेच्या स्थापनेच्या निमित्ताने झालेल्या सभेत अजित काळे यांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि त्यांच्या न्यायहक्कांसाठी लढा देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने संघटनेच्या माध्यमातून एकजूट झाली पाहिजे. एकत्रितपणे काम केल्यासच प्रशासन व शासनावर दडपण निर्माण करता येईल.”
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या आणि संघटनेच्या कार्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. भविष्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शाखाध्यक्ष विश्वनाथ विधाटे यांनी सर्वांचे स्वागत केले. उपाध्यक्ष शिवाजी कडू व त्यांची कार्यकारणी घोषित करण्यात आली त्याचबरोबर सर्व जण उपस्थित होते.
कार्यक्रमाला अनेक शेतकरी नेते, स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते. या नव्या संघटनेमुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ आप्पा तूवर तालुका अध्यक्ष अशोक मेजर काळे तालुका युवा शेतकरी आघाडी , तालुकाध्यक्ष रोहित कुलकर्णी, उपाध्यक्ष नागवडे, कायदेशीर सल्लागार अडवोकेट कावळे, विश्वास मते, शिवाजी काळे उर्फ ठाकरे, दत्तू पाटील निकम जेष्ठ मार्गदर्शक, सोमनाथ औवटी, शेतकरी संघटनेचे नेते दादासाहेब नाबदे, बापूसाहेब देशमुख,किरण नंगे, सुधाकर देशमुख,अनेक शाखाध्यक्ष व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते