स्वातंत्र्याची आस म्हणजे काय?* अमर हबीब
किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही. येथे कोणी अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष नाही. ज्या कोणाला शेतकरी स्वातंत्र्यासाठी झगडावे वाटते, ते सगळे किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते, नेते आहेत. आई आजारी पडली तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी कोणाच्या परवानगीची जशी गरज पडत नाही, तसेच किसानपुत्र आंदोलनाचे काम करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही.
*स्वातंत्र्याची आस म्हणजे काय?*
अमर हबीब
नेवासा (प्रतिनिधी) किसान पत्र आंदोलन ही संघटना नाही. येथे कोणी अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष नाही. ज्या कोणाला शेतकरी स्वातंत्र्यासाठी झगडावे वाटते, ते सगळे किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते, नेते आहेत. आई आजारी पडली तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी कोणाच्या परवानगीची जशी गरज पडत नाही, तसेच किसानपुत्र आंदोलनाचे काम करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही.
‘स्वातंत्र्याची आस’ म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव. जी बंधने आहेत, ती दूर करणे म्हणजे स्वातंत्र्याकडे वाटचाल करणे. शेतकऱ्यांवर कोणती बंधने आहेत? यादी करायला गेलो तर शेकडो नव्हे हजारो बंधने दिसतील. एक एक बंधन दूर करीत बसलो तर आपले आयुष्य पुरणार नाही. त्यासाठी थोडा विचार करून ठरवायचे की, अशी कोणती बंधने आहेत की, जी हटली तर बाकीची बंधने आपोआप हटतील. आम्ही असा विचार केला, तेंव्हा आमच्या लक्षात आले की, 1) कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग) 2) आवश्यक वस्तू कायदा आणि 3) जमीन अधिग्रहण कायदा.
हे तीन कायदे हटले की, परिस्थितीच बदलून जाते. म्हणजे हे कायदे असल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. या कायद्यांनी ही व्यवस्था निर्माण केली आहे. हे तीन कायदे रद्द झाले तर बाकीची अनेक बंधने गळून पडतील, जी राहतील ती रद्द करून घेण्याची ताकत शेतकऱ्यांमध्ये आलेली असेल.
किसानपुत्र आंदोलनाचा मुद्दा विचारांचा आहे. त्यासाठी थोडा अभ्यास करावा लागेल. हे काम कठीण आहे. रूढ अर्थाने जशी आंदोलने होतात, तसे हे आंदोलन नाही. गर्दी जमवणे, घोषणा देणे, भाषण करणे, मोर्चा काढणे हे आंदोलनाचे तंत्र आता पुरे झाले! चळवळ म्हणजे विचार रुजवणे! त्यासाठी नव्या आयुद्धांची गरज आहे. आंदोलनाचे नवे तंत्र आपल्याला शोधावे लागेल.
नाविलाजाने का होईना, सरकारने 1990 साली खुलीकरणाचे धोरण स्वीकारले. खरे तर, त्याच वेळी शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे रद्द व्हायला पाहिजे होते, दुर्दैवाने तसे झाले नाही. नंतर सरकार बदलले. त्यानेही हे कायदे रद्द केले नाही. आज पर्यंत शेती क्षेत्रात खुलीकरण आलेच नाही. खुलीकरण जरी इंडियात (काही प्रमाणात) आले असले तरी त्याचा एक फायदा शेतकऱ्यांनी करून घेतला. आपली मुले/मुली त्यांनी शेतीच्या बाहेर काढली. या किसानपुत्राना माझे आव्हान आहे की, त्यांनी शेतकरीविरोधी कायदे समजावून घ्यावे व ते रद्द करून घेण्यासाठी प्रयत्न करावे! हे प्रयत्न म्हणजेच किसानपुत्र आंदोलन. हेच शेतकरी स्वातंत्र्याचे आंदोलन आहे!
◆
अमर हबीब, आंबाजोगाई
किसानपुत्र आंदोलन
मो. 8411909909
सोमवार, 11 नोव्हेंबर 2024