मंजुर विकास आराखड्या मुळे व्यवसायिक आनंदी झाले सामान्यहो आत्ताच व्यक्त होऊ नका -डॉ राजेंद्र दाते पाटील यांचे आवाहन*
समाजाच्या गरजाशी संवेदन शीलता निर्माण करणे म्हणजे प्रारूप विकास आराखडा असा अपेक्षित आशय असल्यामुळे सध्या मंजुर विकास आराखडा मंजुरी नंतर समस्त व्यवसायिक आनंदी झाले आहेत त्यामुळे आत्ताच व्यक्त होऊ नका असे आवाहन जन आंदोलन विकास कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे

*मंजुर विकास आराखड्या मुळे व्यवसायिक आनंदी झाले सामान्यहो आत्ताच व्यक्त होऊ नका -डॉ राजेंद्र दाते पाटील यांचे आवाहन*
संभाजीनगर प्रतिनीधी – समाजाच्या गरजाशी संवेदन शीलता निर्माण करणे म्हणजे प्रारूप विकास आराखडा असा अपेक्षित आशय असल्यामुळे सध्या मंजुर विकास आराखडा मंजुरी नंतर समस्त व्यवसायिक आनंदी झाले आहेत त्यामुळे आत्ताच व्यक्त होऊ नका असे आवाहन जन आंदोलन विकास कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे.
डेव्हलपमेंट ॲक्शन प्लॅन हे एक संरचित दस्तऐवज किंवा साधन आहे जे व्यावसायिक किंवा इतर सर्वच उन्नती तथा वाढीसाठी एखाद्या व्यक्तीची उद्दिष्टे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट पावले किंवा कृतींची रूपरेषा देतात.यात सामान्यत: प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी टाइम लाइन, आवश्यक संसाधने,संभाव्य आव्हाने आणि मोजता येण्याजोग्या परिमाणांचा समावेश असतो.
१९९१ च्या मंजूर आराखड्या तील नकाशे आणि प्रारूप विकास आराखड्यातील नकाशां मधील तांत्रीक चुका मुळे गट आणि सर्व्हे नंबरच्या क्षेत्रफळा मध्ये मोठी तफावत निर्माण झाली असुन याचा परिणाम आता रस्त्यांची आखणी विकास परवानगी, रेखांकनाला मंजुरी देताना अडचणी निर्माण होणार असल्याची बाब आपण आक्षेप नोंदवताना घेतलेला आहे.
६ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असुन सदरचा प्रारूप विकास आराखडा तयार करताना इ.एल.यू. एक्झीस्टिंग लॅड यूज म्हणजे अस्तिवात जमीन वापर नकाशा हा विचारत घेता सध्या या जमिनीचा वापर रहिवासी क्षेत्र,क्रीडांगण,स्मशान भुमी,कब्रिस्थान,शाळा,रस्ता,बगीचा व इतर काय उपक्रम अस्तित्वात आहे या सर्व बाबी विचारात न घेता किंवा या बाबत काही एक अभ्यास केल्या शिवाय पी.एल.यू. प्रपोज्ड लॅड यूज म्हणजे भविष्यासाठी प्रस्तावीत करावयाचा अस्तित्वा तील जमीनीचा वापर प्रस्तावीत असलेला नकाशा म्हणजे हा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या नकाशातील परिमाण मोजमापा मध्ये प्रचंड अनेक दुरोगामी परिणाम करणाऱ्या तांत्रीक चुका जाणुन बुजुन कऱण्यात आल्या असुन या परिणामांचा योग्य वापर केलेला नसल्यामुळे गट आणि सर्व्हे नंबर मधील परीमाणा मधील लांबी व रुंदी परिणामातः प्रचंड अयोग्य बाबी व चुका झाल्या असुन प्रारूप आराखडा तयार करतांना प्रस्तावित नकाशांचा दर्शविण्यात आलेला परिमाण आणि यापूर्वी १९९१ मधील मंजूर नकाशा तील परीणाम यामध्ये तफावत आली आहे. या तफावतीमुळे विकास आराखड्या तील रस्त्यांची आखणी,विकास परवानगी, रेखांकन मंजुरी आणि इतर तत्सम परवानगी देतांना चुकलेल्या या बाबींचा नक्कीच परिणाम होणार असल्याची गंभीर तक्रार आपण नोंदवलेल्या असुन आता नक्की कशास मंजुरी दिली तो नकाशा पाहिल्या शिवाय समिती पैकी कृपया कोणीही व्यक्त होउ नये असेही आवाहन जन आंदोलन विकास कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक डॉ.राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे.