Breaking
अहमदनगरकायदा आणि प्रशासनतहसीलपंचनामाब्रेकिंगभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहाराष्ट्रसंभाजीनगर

प्रहार जनशक्ती पक्षाने 12 व 17 सप्टेंबर रोजी खडका फाटा टोल नाका बंद करून जागतिक बँक प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनाची हाक दिली होती अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रहार चे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे

जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांच्या दुरावस्थे बाबत

0 2 2 2 3 5

 

अहमदनगर ( प्रतिनिधी) दिनांक 25 सप्टेंबर रोजी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय अहमदनगर येथे पुणे अहमदनगर ते संभाजीनगर या महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थे बाबत तातडीची बैठक घेण्यात आली

 

प्रहार जनशक्ती पक्षाने 12 व 17 सप्टेंबर रोजी खडका फाटा टोल नाका बंद करून जागतिक बँक प्रकल्प कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनाची हाक दिली होती अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रहार चे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांना आंदोलन थांबवावे संबंधित विभागाची तातडीची बैठक बोलावण्याचा शब्द रस्ता सुरक्षा समिती बैठकीमध्ये पोटे यांना दिला होता त्यांच्या आदेशा वरूनच 25 सप्टेंबर रोजी सा बा वि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अ.नगर जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांच्या दुरावस्थे बाबत अधीक्षक अभियंता भारतकुमार बाविस्कर सार्वजनिक बांधकाम विभाग जागतिक बँक प्रकल्प विभाग सर्व शासकीय अधिकारी व चेतक आणि केटीई संगम या कंत्राटदारांच्या उपस्थितीत संभाजीनगर ते अ.नगर महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात बैठकीत प्रहार जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्या मार्गदर्शक सूचना दुरुस्ती बाबत सूचना पटलावर घेण्यात आल्या पोटे यांनी खडका फाटा व सुपा टोलनाक्यावर अद्ययावत स्वच्छतागृह स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून रस्त्यावरील दुरुस्ती रंगरंगोटी रोड फर्निचर चे काम सुधारून संपूर्ण महामार्गावर खाचखळगे झाले असल्याने पुन्हा या रस्त्यावर नवीन थर देण्याची मागणी केली तसेच सध्या सुरू असणारे खड्डे बुजवण्याचे काम बॉक्स कटिंग करून पॅचवर्क पद्धतीने करण्याची मागणी केली असता अधीक्षक अभियंता भारत कुमार बाविस्कर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून संभाजी नगर हद्द ते अहमदनगर पर्यंत 25 एम एम संपूर्ण महामार्गाला एस डी बी सी प्रमाणे नवीन थर देऊन आपण केलेल्या सूचनेप्रमाणे तातडीने कामाला सुरुवात करत असल्याचे सांगितले या बैठकीला जागतिक बँक प्रकल्प विभागाचे एल बी जाधव कार्यकारी अभियंता, ए व्ही चव्हाण कार्यकारी अभियंता एस डी शेळके सहाय्यक अभियंता कार्यकारी अभियंता चेतक आणि केटीई संगम कंपनीचे सर्व व्यवस्थापकीय अधिकारी हजर होते 

 

चौकट

अहमदनगर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी रस्ता सुरक्षा समिती बैठकीत संभाजीनगर ते अहमदनगर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दिलेला शब्द पूर्ण केला आहे आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागतिक बँक प्रकल्प विभाग खडका आणि सुपा टोल वसूल करणाऱ्या के टी ई संगम आणि चेतक कंपनीकडून किती तात्काळ काम करून घेतात हे बघू अन्यथा दोन्हीही टोल नाके कायमचे बंद करण्याचा बंदोबस्त करू

—अभिजीत पोटे जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष अमदनगर

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे