ऊस शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत; साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी.. जिल्हा उपाध्यक्ष हरी आप्पा तुवर
राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप पूर्ण करून शेतकऱ्यांचे पंधरवडा पेमेंट देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

ऊस शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत; साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी.. जिल्हा उपाध्यक्ष हरी आप्पा तुवर
नेवासा: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप पूर्ण करून शेतकऱ्यांचे पंधरवडा पेमेंट देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.
शेतकरी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला असून, “शेतकऱ्यांनी जर बँकांकडून किंवा कंपन्यांकडून पीक कर्ज घेतले, आणि त्याची परतफेड उशिरा केली, तर त्यांना व्याज आकारले जाते. मग, साखर कारखान्यांनी जर आमच्या पैसे उशिरा दिले, तर त्यावर व्याज का दिले जात नाही?” असा सवाल नेवासा तालुक्यातील शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे.
ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले असून, वेळेवर पैसे न मिळाल्याने खतं, बियाणं आणि मुलींची व मुलांची विवाह करण्यासाठी खर्चाच्या अडचणीत वाढ इतर शेतीसाठी आवश्यक बाबींसाठी त्यांना मोठे आर्थिक संकट सहन करावे लागत आहे. याबाबत त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावेत, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
राज्य सरकार आणि सहकार खात्याने तातडीने हस्तक्षेप करून साखर कारखान्यांना कारवाईचा इशारा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.