स्व मारुतराव घुले पाटील स्मृती पुरस्काराने डॉ ढगे सन्मानित
कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शेतकऱ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शन केले आहे विशेषतः विविध पिकांची प्रात्यक्षिके व मिळावे घेऊन कृषी तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली डॉक्टर ढगे यांनी शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान
नेवासा (प्रतिनिधी) नेवासा लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या 94व्या जयंतीच्या निमित्ताचे औचित्य साधून त्यांच्या स्मृती पुरस्काराने कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांना ह भ प गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर नरेंद्र पाटील घुले होते कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शेतकऱ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शन केले आहे विशेषतः
विविध पिकांची प्रात्यक्षिके व मिळावे घेऊन कृषी तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली डॉक्टर ढगे यांनी शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान सांस्कृतिक मंडळ लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या समितीने शिफारस देण्यात आल्यामुळे करण्यात आला कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार चंद्रशेखर भाऊ घुले पाटील तसेच शेवगाव पंचायत समितीचे अध्यक्ष डॉक्टर क्षितिज भैया घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची उपाध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग काकासाहेब नरोडे जेष्ठ संचालक अडवोकेट देसाई आबा देशमुख काशिनाथ अण्णा नवले काकासाहेब शिंदे व सर्व संचालक उपस्थित होते