जोऱ्हापुर– देवटाकळी रस्त्यावरील धोकादायक पुलाच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची तातडीची मागणी
जोऱ्हापुर देवटाकळी या मार्गावरील नवदरीहून शेवगावकडे येताना असलेला पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार शेवगाव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

📰
खबरनामा न्यूज | ता. 18 ऑगस्ट 2025
जोऱ्हापुर– देवटाकळी रस्त्यावरील धोकादायक पुलाच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची तातडीची मागणी

प्रतिनिधी (ता. शेवगाव) जोऱ्हापुर देवटाकळी या मार्गावरील नवदरीहून शेवगाव येताना असलेला पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार शेवगाव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सदर पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने दररोज प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात तर या पुलावरून वाहनं ने-आण करणे अत्यंत कठीण झाले असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर १९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेऊन काम सुरू झाले नाही, तर ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील. तसेच कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर सही करणारे ग्रामस्थ:
1. बबन सांगळकर मेरठ
2. संतोष सांगळकर मेरठ
3. संजीव नानासाहेब मेरठ
4. महादेव बाबासाहेब सालुंके
5. गोविंद शंकरराव सालुंके
6. संदीप बाबासाहेब मेरठ
7. दत्तात्रय बापूराव मेरठ
8. विवेक किशोर भगत
9. विनोद संजय दिपक
10. विठ्ठल सानप दीपक
11. विलास सानप दीपक
12. राजेंद्र गोविंद दीपक
13. दत्तात्रय नानासाहेब दीपक
14. सुरेश नानासाहेब दीपक
15. सुहास नानासाहेब दीपक
16. संदीप गोविंद दीपक
👉 ग्रामस्थांनी एकमुखाने प्रशासनाने तातडीने पुलाची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीसाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
✍️ खबरनामा न्यूज प्रतिनिधी




