Breaking
ई-पेपरकृषीवार्तागोवंश बंदी कायदापंचायत समिती शेवगावपशुसंवर्धन महाराष्ट्र शासन विभागपालकमंत्री राधाकृष्ण विखेपुनर्वसन विभाग मंत्रालयब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईराजकियविमा कंपनीशेतकरी आंदोलनस्वातंत्र्य दिनहमीभावहुकूमशाही

गाय-म्हशी खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाची ५०% अनुदान योजना जाहीर

महाराष्ट्र शासन व दुग्धविकास विभागामार्फत राज्यातील शेतकरी व पशु पालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गाई-म्हशी खरेदीसाठी ५०% पर्यंत अनुदान देण्यात येणार असून अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थ्यांना ७५% पर्यंत अनुदान मिळणार आहे.

0 6 0 6 2 8

गाय-म्हशी खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाची ५०% अनुदान योजना जाहीर

 

मुंबई : महाराष्ट्र शासन व दुग्धविकास विभागामार्फत राज्यातील शेतकरी व पशु पालकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गाई-म्हशी खरेदीसाठी ५०% पर्यंत अनुदान देण्यात येणार असून अनुसूचित जाती-जमातींच्या लाभार्थ्यांना ७५% पर्यंत अनुदान मिळणार आहे.

योजनेचे वैशिष्ट्ये :

गटामध्ये दोन गाई किंवा दोन म्हशी देण्यात येणार.

सामान्य शेतकऱ्यांसाठी खरेदी किंमतीवर ५०% अनुदान तर अनुसूचित जाती-जमातींसाठी ७५% अनुदान.

 

खरेदी किंमत :

दोन गाईंचा गट – ₹1,56,850

दोन म्हशींचा गट – ₹1,79,258

 

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन (ah.mahabms.com किंवा AH-MAHABMS अॅप) द्वारे.

अर्ज कालावधी २ मे ते १ जून २०२५ निश्चित.

या योजनेमुळे राज्यातील दुग्धव्यवसाय वाढीस लागेल, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.

जिल्हा पातळीवर पशुसंवर्धन विभाग योजनेची अंमलबजावणी करणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

✍️ खबरनामा न्यूज नेटवर्क

📍 नरेंद्र पाटील काळे, वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे