तालुका स्तरीय शालेय कब्बडी स्पर्धेला त्रिमूर्ती कबड्डी आकादमी मध्ये सुरुवात*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद व दादासाहेब हरिभाऊ घाडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुकिंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या आहेत. वय वर्ष सतरा व एकोणवीस मुले व मुली यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली.नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे तालुकास्तरीय अंडर नायनटिन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात.

*तालुका स्तरीय शालेय कब्बडी स्पर्धेला त्रिमूर्ती कबड्डी आकादमी मध्ये सुरुवात*
नेवासा: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद व दादासाहेब हरिभाऊ घाडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुकिंदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या आहेत. वय वर्ष सतरा व एकोणवीस मुले व मुली यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली.नेवासा तालुक्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे तालुकास्तरीय अंडर नायनटिन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात. रोमहर्षक रोमांचित सामने रंगत. आहे. खेळाडू खेळातून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त होतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक आहे. कार्यक्रम सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच महादेव काकडे सर यांनी केले.

या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऍड. सुमती ताई घाडगे, प्रमुख पाहुणे म्हणुन ऍड. स्नेहल चव्हाण, सचिव मनीष घाडगे पाटील, सह सचिव डॉ. श्रुती आमले पाटील, विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव काळे सर, क्रीडा प्रमुख संजय सिंह चव्हाण, नेवासा तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तुवर पाटील सर, त्रिमूर्ती पब्लिक स्कूल चे प्राचार्य अरविंद देशमुख सर, विभाग प्रमुख ताके सर, आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान म्हणजे खेळाडू बनवण्याचा कारखाना आहे. राष्ट्रीय अंतराष्ट्रीय खेळाडू येथे घडवले जातात.
स्पर्धेसाठी नियोजन करणारे क्रीडा प्रशिक्षक संभाजी निकाळजे, दळवी सर, दाणे सर, पानकडे सर, जाधव सर, शिंदे सर, संदिप वाघमारे सर, पैठणे सर, शेळके सर, शैलेश सर, गौरव सर, समीर पठाण सर, संजय पावरा सर, नितीन चिरमाडे सर, समिती प्रशिक्षक आदींनी स्पर्धा पार पाडण्यासाठी नियोजन केले आहे.
या स्पर्धेसाठी विशेष भेट धर्मरक्षक गणेश चौगुले सर, क्रीडा प्रशिक्षक सुनील गर्जे सर, इंडियन आर्मी खो खो खेळाडू शंभु आदमने, महेश आघाडे आदी उपस्तित होते.





bb