जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या निवेदनाची केंद्र सरकारकडून दखल
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रीय कृषिमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद


📰 जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या निवेदनाची केंद्र सरकारकडून दखल
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रीय कृषिमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
नवी दिल्ली | प्रतिनिधी
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन (भारत सरकार नोंदणीकृत) यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांबाबत दिलेल्या निवेदनाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर तसेच महाराष्ट्र किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ पाटील कोरडे यांनी दिल्ली येथे सादर केलेल्या पत्रानंतर ही महत्त्वाची घडामोड घडली आहे.

या निवेदनाच्या अनुषंगाने केंद्रीय कृषिमंत्री मा. शिवराजसिंह चौहान यांनी आवश्यक निर्णय घेतल्याचे स्पष्ट करत, त्यासंदर्भातील अधिकृत लेखी पत्र संबंधितांना पाठवले आहे. तसेच या विषयावर लवकरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांच्या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या भूमिकेची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे देशातील शेतकरी वर्गाला निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वासही फेडरेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
या यशस्वी पाठपुराव्यासाठी महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील कोरडे आणि जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता दाखवत सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने केंद्र सरकारचे आणि केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

✍️ खबरनामा न्यूज
शेतकरी, हक्क आणि न्यायासाठी कटिबद्ध पत्रकारिता




