*शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची 90 वी जयंती दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे साजरी.*
शरद जोशी यांचेच विचारच देशाला वाचवतील -- मा.शिवाजीनाना नांदखिले*

*शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची 90 वी जयंती दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे साजरी.*
*शरद जोशी यांचेच विचारच देशाला वाचवतील — मा.शिवाजीनाना नांदखिले*
शरद जोशी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य मौल्यवान आहे. त्यांनी दिलेल्या सूचना सरकारने ज्या त्यावेळी अंमलात आणल्या असत्या तर आज जगातील पहिल्या नंबरचा आर्थिक सक्षम आपलाच देश असता. अजून वेळ गेलेली नाही सरकारने त्वरित शरद जोशी यांनी सांगितलेल्या सूचनांची अंमलात आणून शेतकरी व शेती संपन्न करावी.
देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकारले. १८ जून १९५१ रोजी पहिली दुरुस्ती हंगामी सरकारने केली. मालमत्तेचा अधिकार आणि शेतकरी विरोधी कायदे करून ते घटनेच्या ९ व्या अनुसूचीमध्ये टाकून ते लागू आहेत. त्या कायद्यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयासारख्या कोणत्याही न्यायालयात आव्हान न देण्याची तरतूद का केली जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. भारत जगाशी तुलना करत आहेत अमेरिकेसारख्या देशात प्रत्येक पाच वर्षाला शेतीचे कायदे बदलले जातात. पण आपल्याच देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच कायदे आजही आहेत ते बदलणे गरजेचे आहे.
शरद जोशी यांची जयंती आम्ही विचाराने साजरी केली. या जयंतीच्या कार्यक्रमात आम्ही खालील विषयावर चर्चा केली.
१) कंपन्यांमधील कृषी यंत्रसामग्रीची एमआरपी वेबसाइट आणि सरकारी शेतकरी पोर्टलवर प्रकाशित करणे.
२) सरकारने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आहे, आवश्यक वस्तू कायदा लावून निर्यातीवरील बंदी.
३) कृषी मालावरील निर्यात बंदी उठवा.
४) जीएम बियाण्यांच्या वापरावरील निर्बंध उठवावेत.
५) पीक विमा.
६) दोन साखर कारखान्यांमधील अंतर काढून टाकणे.
७) किमान आधारभूत किंमत (सीएसीपी) रद्द करावे आणि भारतीय संविधानाच्या कलम ३२३ (२ब, जी) नुसार लवाद स्थापन करून भाव द्यावेत. (कापूस, सोयाबीन, ऊस इत्यादी पीक उत्पादनांची) विक्री करताना जीएसटी काढून टाका. आम्ही कोणताही जीएसटी घेऊ शकत नाही, मग आम्ही जीएसटी का द्यावा?
९) सर्व शेतकऱ्यांना अफू शेतीचा परवाना मिळणे.
१०) वन्य प्राणी संरक्षण कायदा आणि गो वंश हत्येचा बंदी कायदा रद्द करावा.
११) मनरेगाशी शेतीला जोडणे.
१२) विद्यमान कृषी कर्ज माफ करावे कारण ते चुकीच्या सरकारी धोरणांमुळे आहेत.
१३) तंत्रज्ञान आणि विज्ञान स्वातंत्र्य.
१४) आपल्या सरकारने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आहे, मग शेती मालाच्या निर्यातीवर बंदी का? दोन साखर कारखान्यांमध्ये अंतर जीएम बियाण्यांवर बंदी का?
१५) कार्बन क्रेडिट
या विषयावर सखोल चर्चा झाल्या.
या जयंती साठी अजय वीर जाखड अध्यक्ष भारत कृषक समाज, अशोक बलियान पिजंट वेल्फेअर असोसिएशन उत्तर प्रदेश, संतोष जयस्वाल झारखंड, धर्मेंद्र मलिक भारतीय किसान युनियन उत्तर प्रदेश, लीलाधर राजपूत किसान मजदूर महासंघ मध्यप्रदेश, राजेश धाकड राष्ट्रीय किसान मजदूर संघ मध्य प्रदेश, ब्रिजेश शर्मा किसान मंच बिहार, मनीष नैन हरियाणा, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, बाळासाहेब पठारे, नंदकुमार पाटील, शंकर मोहिते, पांडुरंग रायते, वस्ताद दौंडकर, चंद्रकांत भराटे लक्ष्मीकांत कौठकर आदी प्रमुख उपस्थित होते.




