Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषीवार्तातहसीलनेवासा तालुकापंचनामामुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईविमा कंपनीस्वातंत्र्य दिनहमीभावहुकूमशाही

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील म्हाळापुर शिवारात पिकांचे नुकसान – विमा कंपन्यांनी तातडीने मदत करावी : मागणी

नेवासा तालुक्यातील म्हाळापुर शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल ओढ्यात आलेले प्रचंड पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केली आहे.

0 6 0 6 2 1

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील म्हाळापुर शिवारात पिकांचे नुकसान – विमा कंपन्यांनी तातडीने मदत करावी : मागणी

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील म्हाळापुर शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल ओढ्यात आलेले प्रचंड पाणी शेतकऱ्यांच्या शिवारात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केली आहे.

खडका व देवगड फाटा शिवारात झालेल्या पावसानंतर रेल ओढा तुडुंब भरून वाहू लागला. त्यामुळे म्हाळापुर शिवारातील जगन्नाथ भिवशेन कोरडे व भास्कर भीमसेन कोरडे यांच्या ऊस व चारा (कडू ज्वारी) पिकात पाणी शिरले. तसेच खेडले काजळी शिवारात रायभान कोरडे व जगन्नाथ भाऊसाहेब कोरडे यांच्या सोयाबीन पिकावर पाण्याचा प्रकोप झाला. चंद्रकांत काळे व नारायण रावसाहेब कोरडे यांच्या ऊस व सोयाबीन पिकाचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. सुनिता राधाकृष्ण कोरडे यांच्या उसामध्ये पाणी शिरल्याने त्यांनाही मोठ्या प्रमाणावर झळ पोहोचली आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी ही पिक विमा कंपन्यांची असून, त्यांनी तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात सखा हरी पाटील कोरडे यांनी शेतात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच छायाचित्रे काढून संबंधित माहिती दिली. पिकांचे झालेले नुकसान स्पष्ट दिसत असून, नैसर्गिक संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मदत मिळणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

✍️ खबरनामा न्यूज नेटवर्क

 

1/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे