Breaking
ब्रेकिंग

नेवाशात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ

मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींच्या हस्ते ८ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन सोहळा

0 6 0 6 2 6

📰

नेवाशात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींच्या हस्ते ८ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन सोहळा

नेवासा | प्रतिनिधी – खबरनामा न्यूज

नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवारी दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न होणार आहे. न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या इमारत प्रकल्पामुळे नेवासा तालुक्यातील न्यायालयीन कामकाजाला मोठी गती मिळणार आहे.

या समारंभाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती श्रीमती विभा कंकणवाडी यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती रोहित जोशी उपस्थित राहणार आहेत.

तसेच अहमदनगर येथील प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आशीष पाटील यांच्या उपस्थितीत हा कोनशिला समारंभ पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे स्थळ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, नेवासा (ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे निश्चित करण्यात आले आहे. या समारंभासाठी न्यायालयीन अधिकारी, वकील संघटना, स्थानिक मान्यवर तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अजय प्र. रिंदे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश नेवासा श्री. हरिभाऊ रा. वाघमारे तसेच जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशन नेवासा अध्यक्ष अॅड. लक्ष्मण ज. घावटे हे कार्यरत आहेत.

नेवाशाच्या न्यायिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा कोनशिला समारंभ महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

— संपादन : खबरनामा न्यूज पोर्टल

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे