Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालजिल्हाधिकारीतहसीलतहसीलदार नेवासानेवासानेवासा तालुकापंचनामापालकमंत्री राधाकृष्ण विखेपोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासन कर्ज माफीमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना नेवासासंवाद विधानसभास्वातंत्र्य दिनहमीभाव

विशेष 👉 “पंचनामा नको – शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत द्या!” – त्रिंबक भदगले यांचा इशारा

नेवासा तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटनामागे अनुदान, सातबारा कोरा करुन तात्काळ कर्जमुक्तीची मागणी • “भारताचा नेपाल करून घेऊ नका” असा गंभीर इशारा

0 6 0 6 2 6

📰 खबरनामा न्यूज विशेष

👉 “पंचनामा नको – शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत द्या!” – त्रिंबक भदगले यांचा इशारा

 

नेवासा तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर • कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटनामागे अनुदान, सातबारा कोरा करुन तात्काळ कर्जमुक्तीची मागणी • “भारताचा नेपाल करून घेऊ नका” असा गंभीर इशारा

 

बातमी:

नेवासा (प्रतिनिधी) –

“पंचनामा व फोटो शेषणचा बडगा अजिबात नको, शेतात पंचनामा करायला काहीच शिल्लक नाही. सातबारा उताऱ्यानुसार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग केली जावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्केट कमिटीमध्ये विक्री केलेल्या व करणार असलेल्या मालावर प्रतिटनामागे अनुदान द्यावे. तसेच सातबारा कोरा करून तात्काळ कर्जमुक्तीची अंमलबजावणी करावी,” अशी ठाम मागणी शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाध्यक्ष त्रिंबक भदगले यांनी केली.

 

नेवासा तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी भदगले यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, “भारताचा नेपाल करून घेऊ नका.”

 

या आंदोलनावेळी काँग्रेस पक्षाचे संभाजीराव माळवदे, बामसेफचे अध्यक्ष गणपत मोरे, काँग्रेस नेते अंजुम भाई पटेल, युवक नेते सतिश तराळ, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष शेषराव गव्हाणे, तसेच चंद्रकांत राऊत उपस्थित होते.

 

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे