Breaking
आत्महत्याग्रस्त शेतकरीई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषीवार्तापंचनामाविमा कंपनीशेतकरी विरोधी कायदेसंपादकीय

✍️ कर्जमाफी : उपकार नव्हे तर लूट वापसी

कर्ज माफी इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना देऊ नका" या अमर हबीब सरांच्या मताशी मी ठाम असहमत आहे. कारण कर्जमुक्ती ही काही सरकारची दानधर्माची योजना नाही, तर ती लूट वापसी आहे. 🚜 शेतकऱ्यांची अब्जावधींची लूट

0 6 0 6 1 8

✍️ कर्जमाफी : उपकार नव्हे तर लूट वापसी!

“कर्ज माफी इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना देऊ नका” या अमर हबीब सरांच्या मताशी मी ठाम असहमत आहे. कारण कर्जमुक्ती ही काही सरकारची दान धर्माची योजना नाही, तर ती लूट वापसी आहे.

🚜 शेतकऱ्यांची अब्जावधींची लूट

केंद्र सरकारच्या कृषीद्रोही धोरणांमुळे गेल्या दहा वर्षांत फक्त हमीभाव घोषित होणाऱ्या 23 पिकांमध्येच शेतकऱ्यांची तब्बल 45 लाख कोटी रुपयांची लूट झाली आहे. इतर पिकांचा हिशोब स्वतंत्र आहे.

🏦 शेतकऱ्यांना किरकोळ कर्जमाफी – उद्योगपतींना अब्जावधींची मेजवानी

एकदा 2008 मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केलेली कर्जमाफी फक्त 71,600 कोटी रुपये इतकी होती.

ही रक्कम अब्जाधीश उद्योगपतींना गुपचूप दिलेल्या कर्जमाफीच्या केवळ 2.4% इतकी आहे.

दरम्यान, गेल्या नऊ वर्षांत उद्योगपतींचे तब्बल 15.6 लाख कोटींचे कर्ज थेट माफ करण्यात आले.

NPA (Non-Performing Assets) गृहीत धरल्यास ही रक्कम जवळपास 30 लाख कोटींवर पोहोचते.

💰 कार्पोरेट टॅक्स कपात – कोणासाठी?

2019 साली मोदी सरकारने कंपन्यांचा करदर (Corporate Tax) 30% वरून 22% वर आणला.

👉 यामुळे सरकारला दरवर्षी 1.5 लाख कोटींचे नुकसान होते.

👉 शेतकऱ्यांची कर्जमाफी एकदाच होते, पण उद्योगपतींचा करसवलतींचा फायदा दरवर्षीचा आहे.

📉 कर माफी व सबसिडीचा सागर

गेल्या आठ वर्षांत बड्या उद्योगपतींना 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर माफी दिली गेली. त्यात सरकारी अनुदान, करसवलती व विविध विशेष पॅकेजेस वेगळे आहेत.

👨‍🌾 शेतकरी व भूमिहीनांचा प्रश्न

एक किसान पुत्र शहरात जाऊन चांगल्या नोकरीत स्थिरावतो आणि आपली जमीन भूमिहीन शेतकऱ्याला कसण्यासाठी देतो.

👉 त्यात नुकसान झाल्यास त्या भूमिहीनाला भरपाई कोण देणार?

👉 त्यामुळे कर्जमाफी सरसकट सर्व भूमिधारकांना मिळाली पाहिजे.

निष्कर्ष

शेतकरी कर्जमाफी ही दया किंवा उपकार नसून, गेल्या अनेक दशकांत शेतकऱ्यांच्या झालेल्या आर्थिक लुटीची थोडीशी परतफेड आहे.

👉 सरकार उद्योगपतींना हजारो लाख कोटींचे करमाफी, कर्जमाफी, सबसिडी देऊ शकते; मग शेतकऱ्यांना न्याय देताना आडकाठी का?

✍️ लेखन व संकलन : नरेंद्र पाटील काळे

📢 खबरनामा न्यूज – शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एक पाऊल पुढे

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे