Breaking
क्रिडा व मनोरंजनक्रीडा वार्ताजिल्हा परिषद शाळा उपक्रमनेवासा तालुकापुरस्कारब्रेकिंगभानसहिवरा गटभेंडा गट जिल्हा परिषद निवडणूकवकृत्व स्पर्धाविशेष निवडवृक्षारोपण अभियानशिक्षण विभाग पुणेसांस्कृतिक कार्यक्रमस्पर्धा परीक्षेत यश 2025

✨ खरवंडी बीटस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न

भानसहिवरा येथे आयोजित स्पर्धेत चार केंद्रांतील विजयी शाळांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना व्यासपीठ, शिक्षकांचे मोलाचे योगदान

0 6 0 6 2 6

✨ खरवंडी बीटस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न

भानसहिवरा येथे आयोजित स्पर्धेत चार केंद्रांतील विजयी शाळांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना व्यासपीठ, शिक्षकांचे मोलाचे योगदान

भानसहिवरा | प्रतिनिधी

खरवंडी बीटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बीटस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा भानसहिवरा येथे नुकत्याच अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये भानसहिवरे, खरवंडी, बेलपिंपळगाव व उस्थळ दुमाला या चार केंद्रांतील प्रथम क्रमांक पटकावलेल्या शाळांनी आपला सहभाग नोंदवला.

या स्पर्धांचे उद्घाटन खरवंडी बीटच्या विस्तार अधिकारी मीरा केदार मॅडम, भानसहिवरे केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र कडू पाटील, नेवासा खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख संजय शेळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. संतोष ढवाण तसेच भानसहिवरे शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप सर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धांमध्ये हस्ताक्षर, वक्तृत्व, गोष्ट सादरीकरण, वेशभूषेनुसार सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, समूहगीत गायन आदी विविध कला प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपले सुप्त गुण सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन डॉ. रेवननाथ पवार यांनी केले. यावेळी विशेष शिक्षक सचिन खारगे व गणेश लाड यांची उपस्थिती लाभली. तसेच भानसहिवरे शाळेचे शिक्षक महेश देवतरसे व सृष्टी शिंदे यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

स्पर्धांचे परीक्षण केंद्रातील प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांतील अनुभवी शिक्षकांनी पार पाडले. स्पर्धेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांसाठी भानसहिवरे शाळेच्या वतीने सुरुची भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

यशस्वी विद्यार्थ्यांचे नेवासा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्तार अधिकारी मीरा केदार मॅडम, शेख मॅडम तसेच रवींद्र कडू पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ही गुणदर्शन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भानसहिवरे केंद्रातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

✍️ – खबरनामा न्यूज

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे