Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनगुन्हेगारीतहसीलदेश-विदेशबीडमहाराष्ट्रमुंबईमुंबई उच्च न्यायालयहुकूमशाही

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी ॲड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून अद्यापही नियुक्ती का नाही?*

सरपंच संतोष देशमुख खून खटल्याच्या देशमुख कुटुंबीय व पाच सहा जो गावकऱ्यांनी ज्येष्ठविधी तज्ञ अडवोकेट उजळणी करणे साहेब यांची नेमणूक करावी अशी मागणी केली

0 2 2 2 2 2

*सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी ॲड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून अद्यापही नियुक्ती का नाही?*

 

मुंबई प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख खून खटल्यात देशमुख कुटुंबीय व मस्साजोग गावकऱ्यांनी जेष्ठ विधिज्ञ ॲड.उज्वल निकम साहेब यांची नेमणूक करावी ही मागणी घटना घडल्यानंतर तात्काळ केली होती व सातत्याने ही मागणी त्यांनी लावून धरली आहे.मात्र सरकारने अद्यापही निकम साहेबांची नेमणूक करण्याचा आदेश काढलेला नाही.

 

*या किंवा कोणत्याही अशा गंभीर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक जेवढी उशिरा होईल तितक्या त्रुटी अधिक राहण्याची शक्यता वाढते.याचा फायदा मग आरोपींना मिळतो.*

 

कोपर्डी अत्याचार प्रकरणात तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यास त्यावेळी सरकारला भाग पाडले होते.त्यामुळे तपासातील त्रुटी,चुका कमीत कमी होण्यासाठी व आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी निश्चित मदत झाली होती.

 

*देशमुख कुटुंबियांनी वारंवार मागणी केलेली असतानाही राज्य सरकारने ॲड.उज्वल निकम साहेब यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यास जो उशीर चालवला आहे तो योग्य नाही.ही नियुक्ती तात्काळ करण्यात आली पाहिजे.*

#justiceforsantoshdeshmukh

— संजीव भोर पाटील.

प्रवक्ता, शिवसेना तथा

संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे