अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा कार्यरत ठेवण्याबाबत अपर पोलीस अधीक्षकांचे निर्देश
येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा सतत व विनाव्यत्यय कार्यरत राहाव्यात यासाठी महत्त्वाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा कार्यरत ठेवण्याबाबत अपर पोलीस अधीक्षकांचे निर्देश
अहिल्यानगर, दि. ४ ऑगस्ट २०२५ –
अहिल्यानगर (वाचक शाखा) येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा सतत व विनाव्यत्यय कार्यरत राहाव्यात यासाठी महत्त्वाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
ही कार्यवाही महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य व संपर्क प्रमुख, ज्ञानमाता सेवाभावी संस्था (NGO) संचालित माहिती अधिकार नागरिक समूह चे श्री. योगेश गोरक्षनाथ करपे यांच्या तक्रारीवर करण्यात आली. त्यांनी दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सादर केलेल्या तक्रारीत, जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणांची कार्यक्षमता कमी असल्याचे तसेच राज्य माहिती आयोग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद केले होते.
अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्म यांनी दिलेल्या सूचनांनुसार —

सीसीटीव्ही यंत्रणा सतत, योग्य व विनाव्यत्यय कार्यरत ठेवणे बंधनकारक आहे.
बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्तीसाठी कंत्राटदार मेसर्स. सुजाता कॉम्प्युटर्स प्रा. लि. यांच्याशी समन्वय साधणे आवश्यक आहे.
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागणी केल्यास संबंधित अर्जदारास वेळेत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देणे ही पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
मागील वर्षभरातील सीसीटीव्ही फुटेज संदर्भातील सर्व RTI अर्जांवरील कार्यवाहीचे संक्षिप्त विवरण संबंधित पोलीस ठाण्यांकडून मिळविणे.
या आदेशामुळे पोलीस यंत्रणेतील पारदर्शकता, जबाबदारी व नागरिकांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
✍️ संपादक – नरेंद्र पाटील काळे
खबरनामा न्यूज नेटवर्क




