Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषीवार्ताजिल्हाधिकारीतहसीलदेश-विदेशपंचनामापोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईमुंबई उच्च न्यायालयविमा कंपनीशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यशेतकरी संघटना श्रीरामपूरश्रीरामपूरसंभाजीनगरस्वातंत्र्य दिनहमीभाव

अकारि पडीत शेतजमिनी प्रश्नी शेतकरी संघटनेची मंत्रालयात धडपड; महसूल मंत्री बावनकुळे व जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

शेतकरी संघटनेचे अकारिपडीत शेतजमिनीच्या प्रश्नासंदर्भात गेल्या सोमवारपासून सलग तीन दिवस मुंबईत मंत्रालयात मुक्कामी ठाण मांडून पाठपुरावा सुरू आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहसचिव देशमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

0 2 2 2 3 3

अकारि पडीत शेतजमिनी प्रश्नी शेतकरी संघटनेची मंत्रालयात धडपड; महसूल मंत्री बावनकुळे व जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

 

माळवडगाव (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेचे अकारिपडीत शेतजमिनीच्या प्रश्नासंदर्भात गेल्या सोमवारपासून सलग तीन दिवस मुंबईत मंत्रालयात मुक्कामी ठाण मांडून पाठपुरावा सुरू आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, सहसचिव देशमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजितदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब आसने, सचिन वेताळ, सुनिल आसने, बाबासाहेब वेताळ, सागर गिर्हे, गोरक्षनाथ वेताळ इत्यादी प्रतिनिधी मंडळाने विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन अकारि पडीत शेत जमिनींच्या फाईल विषयी सविस्तर चर्चा केली.

 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच या विषयावर बैठक घेऊन संबंधित फाईल राज्यपालांकडे सादर केली जाईल, असे ठाम आश्वासन दिले. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हा प्रश्न वैयक्तिक लक्ष घालून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. “माझे वडील, स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

 

महसूल विभागातील अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार व सहसचिव देशमुख यांनी देखील फाईल मध्ये असलेल्या त्रुटी दूर करून ती राज्यपाल महोदयां कडे सादर करण्यासाठी तयारी पूर्ण असल्याचे सांगितले.

 

संघटनेने मंत्री विखे पाटील यांना श्रीरामपूर येथे सत्कारा साठी आमंत्रित करण्याचा प्रस्ताव मांडला असता, “शेवटच्या शेतकऱ्याला ही जमीन मिळेपर्यंत मी कोणताही सत्कार स्वीकारणार नाही,” असा भावनिक प्रतिसाद विखे पाटील यांनी दिला.

 

मुंबईतील या भेटीने अकारिपडीत शेत जमिनी संदर्भातील संघर्षाला नवी दिशा मिळाली असून शासनस्तरावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. असे आमचे प्रतिनिधीशी माहिती दिली

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे