Breaking
अँटी करप्शन ब्युरोअँटी करप्शन ब्युरो अहिलेनगरअहमदनगरआत्महत्याग्रस्त शेतकरीई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषीवार्तागुन्हेगारीगौण खनिज बेकायदेशीर उत्खननग्रामपंचायत कारभारजिल्हाधिकारीतहसीलतहसीलदार नेवासादेश-विदेशनेवासा तालुकापंचनामापोलीस स्टेशनपोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहा पारेषण कंपनी विद्युत मंडळमहाराष्ट्र विद्युत मंडळमाहिती अधिकार 2005लाच लुचपत आणि भ्रष्टाचारशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंभाजीनगर उच्च न्यायालयहमीभावहुकूमशाही

एका शेतकऱ्याचा लाल दिव्यापर्यंतचा प्रवास: डीवायएसपी संतोष खाडे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा* 

ऊसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीत प्रवेश करणाऱ्या संतोष खाडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदाची जबाबदारी स्विकारली आहे

0 2 2 1 9 4

एका शेतकऱ्याचा लाल दिव्यापर्यंतचा प्रवास: डीवायएसपी संतोष खाडे यांच्याकडून न्यायाची अपेक्षा* 

 

*नेवासा* – ऊसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीत प्रवेश करणाऱ्या संतोष खाडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदाची जबाबदारी स्विकारली आहे. सध्या प्रशिक्षण कालावधीसाठी नेवासा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या खाडे यांची कार्यक्षमता ओळखली जात असून, त्यांच्या नियुक्तीने स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्नांवर न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

 

*कार्यक्षम अधिकाऱ्याची ओळख*

 

नेवासा परिसरात संतोष खाडे हे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या रूपात ओळखले जातात. कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा कणखरपणा आणि पारदर्शक दृष्टीकोन महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांनी आपल्यासमोरील प्रत्येक प्रकरणात निष्पक्ष निर्णय घेतला, तर अन्यायग्रस्तांना दिलासा मिळू शकतो.

 

*220 केवी अतिउच्च दाब वाहिनी प्रकरण*

 

सध्या नेवास्यातील 220 केवी अतिउच्च दाब वाहिनी प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. संजय ठुबे हे या प्रश्नाचे प्रतिनिधिक स्वरूपातील लाभधारक शेतकरी आहेत. मात्र, असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्यावर अन्याय होत आहे. भूमी अधिग्रहण न करता आणि शेतकऱ्यांचे म्हणणे पूर्णतः नाकारून बळजबरीने पोलीस संरक्षणात अतिउच्च दाबाचे मनोरे उभे केले जात आहेत. या परिस्थितीत कायद्याचा आधार घेऊन संतोष खाडे आपली भूमिका स्पष्ट करणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

*शेतकरी संघटनेच्या अपेक्षा* 

 

शेतकरी संघटनेने या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन योग्य तो तोडगा काढावा, असे मत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

 

संतोष खाडे यांच्या कार्यकाळात हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल का? शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्या न्यायप्रिय भूमिकेचा कस लागणार आहे. पुढील घटनाक्रम ठरवेल की, या प्रकरणाला न्याय मिळेल की नाही!

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे